पुणे : संक्रातीनिमित्त देवदर्शन करून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वातीन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना पाषाण भागात घडली.
हेही वाचा – पुणे : जोशीमठ आणि पाचगणी यात भौगोलिक साधर्म्य? नैसर्गिक मर्यादांवर मानवी अतिक्रमण
हेही वाचा – पुणे : दोन प्रियकरांकडून महिलेचा गळा आवळून खून, तंबाखू माव्याच्या पुडीवरून आरोपी गजाआड
याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पाषाण-सूस रस्त्यावर राहायला आहे. संक्रातीनिमित्त महिला आणि त्यांची जाऊ पाषाण परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन त्या घरी निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्याने तक्रारदार महिलेच्या गळ्यातील सव्वातीन लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक तपास करत आहेत.