रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला मदत करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी महिलेकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना पौड फाटा चौकात घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला पौड रस्ता भागातील शीलाविहार काॅलनी परिसरात राहायला आहेत. त्या कर्वे रस्त्याने जात होत्या. त्या वेळी पौड फाटा चौकात गर्दी होती. दोन चोरट्यांनी त्यांना थांबविले. आजी रस्ता ओलांडून देतो, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले. महिलेने पिशवीत एक लाख रुपयांची सोन्याची कंठी माळ तसेच ५५० रुपये ठेवले होते.

चोरट्यांनी त्यांच्या नकळत पिशवीतून सोन्याची माळ, रोकड असा एक लाख ५५० रुपयांचा ऐवज लांबविला. ज्येष्ठ महिला घरी पोहचली. तेव्हा पिशवीतून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक सपताळे तपास करत आहेत.