सराफ बाजारात दागिने मोडण्यासाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून सात लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली.याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ऊरळी कांचन परिसरात राहायला आहेत. महिला आणि नातेवाईक रविवार पेठेतील सराफ बाजारात दागिने मोडण्यासाठी आल्या होत्या. सराफी पेढीत त्या दागिने मोडण्यासाठी गेल्या.
हेही वाचा >>> पुणे : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडे लाचेची मागणी ; दौंडमधील महसूल सहायकाला पकडले
त्या वेळी पिशवीतून सात लाख २५ हजारांचे दागिने चोरण्यात आल्याचे महिलेचे लक्षात आले. तक्रारदार महिला ऊरळी कांचन परिसरातून पीएमपी बस आणि रिक्षाने प्रवास करुन सराफ बाजारात आली होती. प्रवासा दरम्यान महिलेच्या पिशवीतून दागिने चोरण्यात आल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिसांनी रविवार पेठेतील सराफ बाजारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.