लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बंगल्यातून चोरट्यांनी कपाटातील १२ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे आई-वडील देवदर्शनासाठी बाहेर गेले होते. त्यांचा वडगाव बुद्रुक भागातील वेणूताई महाविद्यालय रस्त्यावर बंगला आहे. चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी बंगल्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून चोरट्यांनी १२ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
आणखी वाचा-रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक, महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा
बंगल्याच्या दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.शहरात घरफोडीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सोसायटीतील बंद सदनिका हेरून चोरटे कुलुप तोडून ऐवज चोरून नेतात.