लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, दिवाळीनंतर प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूरला निघालेल्या तरुणाकडील सहा लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले.

याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मूळचा कोल्हापूरचा असून, तो तेथील एका सराफी पेढीत कामाला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी तो पुण्यातील एका सराफाला दागिने देण्यासाठी आला होता. सराफ व्यावसायिकाला दागिने दिल्यानंतर तो अडीचच्या सुमारास तो स्वारगेट एसटी स्थानकात आला. कोल्हापुरकडे जाणाऱ्या बसमध्ये त्याने दागिन्यांची पिशवी ठेवली.

आणखी वाचा-अमेरिकेत कमला हरली, तशी इथे कमळाबाई हरणार; खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका

तरुणाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी आसनावर ठेवलेली पिशवी चोरून नेली. पिशवीत सहा लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत. दिवाळीत परगावी जाणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारातून प्रवासांकडील दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at swargate st station pune print news rbk 25 mrj