लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बँक खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून दोन कोटी ६५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लॉकरमधील दागिन्यांसह, साडेनऊ लाखांची रोकड, तसेच महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची तक्रार खातेदाराने दिली आहे. याप्रकरणी लष्कर भागातील एका बँकेच्या व्यवस्थापक महिलेसह सराफी पेढीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

याबाबत यश केशवलाल कपूर (वय ४६, रा.सोपानबाग,घोरपडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक नयना अजवानी, सुरेंदर शहानी, तसेच सराफी पेढीचे मालक सतीश पंजाबी यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कर भागातील अरोरा टॉवर्स इमारतीत पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे. कपूर यांनी दोन महिन्यांपूर्वी लॉकर उघडून तपासणी केली. तेव्हा लॉकरमध्ये हिरेजडीत दागिने, रोकड सुस्थितीत होती.

आणखी वाचा-देवळा तालुक्यात धरणात बुडून युवकाचा मृत्यू

६ सप्टेंबर रोजी ते पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेले. तेव्हा १३ ऑगस्ट रोजी बँक व्यवस्थापक अजवानी, शहानी यांनी परवानगी न घेता कपूर यांचे लॉकर उघडल्याची माहिती मिळाली. शहानी यांच्या मदतीने तीन ते चार वेळा प्रयत्न करुन लॉकर उघडण्यात आले. त्यातील हिरेजडीत सोन्याचे दागिने, रोकड, महत्त्वाची कागदपत्रे पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आल्याचे कपूर यांना समजले, असे कपूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

बँकेने नियमांचे पालन न करता लॉकर उघडले. लॉकरमधील दोन कोटी ६५ लाख रुपयांचे दागिने सराफ सतीश पंजाबीला दिले. पंजाबीने दागिने परस्पर वितळविले. पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने वितविळण्यात आल्याचे कपूर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी बँकेस भेट दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे तपास करत आहेत.