पिंपरी : बेकरीच्‍या व्‍यवसायात झालेले नुकसान भरून काढण्‍यासाठी महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.हिफाजत अली इनाम अली अन्सारी (वय २४) आणि समीर फिरोज अन्सारी, (वय २०, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही मूळचे उत्‍तर प्रदेशातील बिजनौ जिल्‍ह्यातील नगीना गावचे रहिवासी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस उपायुक्‍त विशाल गायकवाड यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी या दोघांनी  दुचाकीवरून येऊन दोन महिलांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सुमारे ८० ‘सीसीटीव्ही’ फुटेजची पाहणी केली. त्‍यावरून आरोपी पिंपळेगुरव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. येथील इमारतीच्‍या वाहनतळात शोध घेत असताना आठ फेब्रुवारी रोजी संशयित दुचाकी विशालनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्याची माहिती मिळाली. त्‍यानुसार  सापळा लावून आरोपींना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडे चौकशी केली असता त्‍यांनी गुन्‍ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे दागिने हस्‍तगत केले.

२० तोळे दागिने चोरी करण्‍याचे उद्दिष्ट

 हिफाजत यास बेकरीच्या व्यवसायात नुकसान झाले होते. त्याकरिता २० तोळे सोने चोरी करुन त्या माध्यमातून पैसे मिळवून शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करायचे होते. सोने चोरी करण्यासाठी आरोपी पिंपरी, चिंचवड, बाणेर, भोसरी परिसरात फिरत होते.