पुणे : बंगल्यता शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील चार लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नवी पेठेतील रामबाग काॅलनीत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत समीर सुधाकर देशमुख (वय ४६, रा. आनंद बंगला, लक्ष्मीकृपा सोसायटी, नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देशमुख कुटुंबीय मंगळवारी रात्री बाणेर येथील नातेवाईकांकडे गेले होते. बुधवारी सकाळी देशमुख कुटुंबीय नातेवाईकांकडून परतले. तेव्हा दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून चार लाख ८६ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.