रेल्वे प्रवासा दरम्यान ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी चार लाख ९३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि एक हजाराची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. त्याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ महिला नाशिक परिसरात वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे.

ज्येष्ठ महिला त्यांच्या मूळगावी चाळीसगाव येथे गेल्या होत्या. तेथून त्या रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावर उतरल्या. मुलाच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी पिशवी उघडून पाहिली. तेव्हा पिशवीतील रोकड आणि दागिने असा चार लाख ९३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीस आले.

रेल्वे प्रवासा दरम्यान ऐवज चोरल्याचा संशय महिलेने फिर्यादीत व्यक्त केला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. एस. माने तपास करत आहेत.

Story img Loader