पुण्यातील पोर्श कारच्या अपघातावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अपघात प्रकरणील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांचं या प्रकरणात नाव समोर आलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत नव्हता हे सिद्ध करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिंग विभागातील दोन डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप होत असून या दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना आता पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या दोन्ही डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफांशी संबंध असून मुश्रीफांनीच त्यांना पाठिशी घातल्याचा, त्या पदांवर नियुक्त केल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा