पुण्यातील सदाशिव पेठेत एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने भररस्त्यात हल्ला केला. मंगळवारी (२७ जून) दिवसा ढवळ्या हा हल्ला होत असताना अनेकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे, हर्षद पाटील आणि दिनेश मडावी या तीन तरुणांनी जीवाची बाजी लावत या तरुणीला कोयता हल्ल्यापासून वाचवलं. ही घटना समोर येताच, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या मुलांसाठी ५१ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. त्यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी या तिघांचीही काल (२९ जून) भेट घेतली. भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला आहे.

“पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात,एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो. लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा >> लेशपाल…! कुठे कुठे आणि कसा पोहोचणार? बघ्यांच्या समाजात बाई तू…

ते पुढे म्हणाले की, “या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्का बसला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत. सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांनी त्यांची काळजी पोटी चौकशी केली. परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले. मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे, हे विचारण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली.”

हेही वाचा >> “त्या मुलीची जात कुठली?…”, पुण्यातील कोयता हल्ल्याप्रकरणी लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत

“याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सूर असा दिसला की, ‘आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही. आमच्यासमोर एका मुलीचा जीव जातोय आणि अशा वेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो. आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे, या विचाराने आम्ही तिचा जीव वाचवला…!’ विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत. अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल, यात शंका नाही. मी शब्द दिला होता त्याप्रमाणे, तिघांना पारितोषिक दिलं आहे. या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार आहे”, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लेशपालने पीडितेचा जीव वाचवल्यानंतर त्याला इन्स्टाग्रामवर खूप लोकांनी मेसेज केले. त्या मुलीची आणि मुलाची जात कोणती असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने उद्विग्न होऊन इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला”, अशी इन्स्टाग्राम स्टोरी लेशपालने ठेवली होती.