पुणे : भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काल समोर आल्यानंतर त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात ठाकरे गटाच्या महिला सेनेमार्फत किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या महिला सेनेच्या शहर संघटीका सविता मते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : ‘पीएमपी’च्या प्रवासी दिनात तक्रारींचा पाऊस

हेही वाचा – पुण्यातील नाल्यांची पूरपातळी वाढल्यास आता लगेच मिळणार ‘अलर्ट’, जाणून घ्या नवीन यंत्रणा

सविता मते म्हणाल्या की, किरीट सोमय्या हे नेहमीच भ्रष्टाचाराच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. एका महिलेसोबतचा त्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर भाजपामधील एकही नेता बोलण्यास तयार नाही. त्यामुळे किरीट सोमय्यांवर भाजपा कारवाई करणार का? आमचा हा प्रश्न असून या प्रकरणाच्या निषेधार्थ किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. किरीट सोमय्या यांच्यावर भाजपाने कारवाई न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.