शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेना पुणे शहर यांच्यातर्फे रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाणे : ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले की, ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसैनिकांना आधार दिला. त्याच मातोश्री बद्दल बंडखोर रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध करीत असून येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jode maro protest against of ramdas kadams that statement pune svk