देशाचे नेतृत्व ब्राह्मण करतील असे म्हणणार्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी तोंड सांभाळून बोलावे. अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर सडकून टीका केली. तसेच आजवर ब्राह्मणनानी सत्ता भोगली असून आता आम्हाला देखील सत्तेचे भागीदार होऊ द्या. अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली. देशाचे नेतृत्व ब्राह्मणच करतील असे वक्तव्य पुण्यातील आमदार मेधा कुलकर्णी यांनी ब्राम्हण महासंघाच्या कार्यक्रमात मागील महिन्यात विधान केले होते. त्यावरून विरोधकांनी भाजपला चांगले लक्ष केले होते. तर मेधा कुलकर्णी यांच्या त्या विधानाचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी खरपूस समाचार घेतला असून त्याबाबत कवाडे म्हणाले की, देशातील जनता ब्राम्हण समाजाची गुलाम असावी.अशी मानसिकता मेधा कुलकर्णी यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, न्यायालयाने केरळ येथील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशला परवानगी दिली असताना. त्याला दुसर्या बाजूने विरोध केला जात आहे. यावर मेधा कुलकर्णी भूमिका मांडत नाही. अशा शब्दात त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या वर निशाण साधला.
भीमा कोरेगाव ते चैत्यभूमी दादर दरम्यान संविधान सन्मान मार्चचे आयोजन
संविधान दिनाच्या 69 व्या वर्धापनदिनानिमित्त 26 नोव्हेंबर 2018 ला भीमा कोरेगाव येथून संविधान सन्मान मार्चला सुरुवात होणार असून 6 डिसेंबर 2018 येथे दादर येथील चैत्यभूमी दरम्यान असणार आहे. या संविधान सन्मान मार्चमध्ये राजाच्या अनेक कानाकोपर्यातून भीमसैनिक सहभागी होणार आहे. अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे चे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली. या संविधान सन्मान मार्च च्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधाना बाबत प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.