पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहशहर अभियंत्यांना नव्याने जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत.
सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्याकडे जलनिस्सारण प्रकल्प, झोपडपट्टी निर्मूलन विभाग, घरकुल (स्थापत्य) विभाग देण्यात आले आहेत. सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे स्मार्ट सिटी, स्थापत्य (उद्यान) व क्रीडा (स्थापत्य) तसेच प्रमोद ओंबासे यांच्याकडे प्रकल्प आणि वाहतूक नियोजन हे विभाग देण्यात आले आहेत. ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे पालिकेचे सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमधील स्थापत्यविषयक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.