लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी सायंकाळी दिले. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) मुंबई कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पुणे : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबारात पोलिस कर्मचाऱ्याला अश्रू अनावर

संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलीस आयुक्तपद भूषविले होते. गणेशोत्सव बंदोबस्तासह महत्वाच्या बंदोबस्ताची धुरा कर्णिक यांनी हाताळली होती. शहराचे सहपोलीस आयुक्तपद भूषविताना कर्णिक यांनी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत कर्णिक यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. विविध संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात कर्णिक यांची उपस्थिती असायची. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात कर्णिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.