मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत आळेली जाहिरात हा गेल्या आठवड्यात चर्चेचा विषय ठरला होता. या जाहिरातीमध्ये एका सर्व्हेनुसार मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आल्याचं म्हटलं होतं. यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेले होते. असं असतांना आणखी एक सर्व्हे पुढे आला ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती देण्यात आली आहे.

या सर्व्हेबाबत अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. ” तुम्ही काय बोलताय? किती धादांद खोटे बोलत आहात.तुम्ही परवा जाहिरात बघितली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या पाठिंब्याकरिता आम्हाला २६ टक्के मते मिळाली आहेत आणि तुम्ही काही तरीच सांगत आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रहायचे आहे की नाही” असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत

हेही वाचा >>> पुणे: कर्वेनगरमध्ये पीएमपी बसवर दगडफेक; चालकाला मारहाण

मुख्यमंत्रीपदाच्या पाठिंब्याकरिता आम्हाला २६ टक्के मिळाले आहेत आणि तुम्ही काहीही सांगत आहात. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचे आहे की नाही, अशा शब्दात अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांनी टोला लगावला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Story img Loader