लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: पक्षकारांना न्याय देण्यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अपघातात अपंगत्व आलेल्या महिलेची न्यायाधीशांनी प्रत्यक्ष भेट घेऊन तडजोडीच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. तसेच तडजोडीच्या रक्कमेचा धनादेश न्यायाधीशांनी महिलेला सुपूर्द केला.

लोकअदालतीत महिलेचा दावा निकाली काढून तिला ४७ लाख ९० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आले. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर आणि ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलने दावा निकाला काढला. न्यायालयाने दावा निकाली काढून नुकसान भरपाईचे आदेश दिल्याने अपंगत्व आलेल्या महिला पक्षकार नयना गणेश बोरा (रा. शिरुर) यांना दिलासा मिळाला.

आणखी वाचा- पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बिबट्या ठार, पळसदेव नजीक अपघात

बोरा यांनी त्यांचे वकील ॲड. शशिकांत बागमार आणि ॲड. निनाद बागमार यांच्या मार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरणात नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता. २८ ऑक्टोबर २०१९ रोजी नयना दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या वेळी समोरुन भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने दुचाकीस्वार नयना बोरा यांना धडक दिली होती. अपघातात बोरा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या कवटीचा चुरा झाला. खराडीतील एका खासगी रुग्णालयात बोरा यांना दाखल करण्यात आले होते. अपघातात बोरा यांना शंभर टक्के अपंगत्व आले होते.

बोरा यांनी वकिलांमार्फत ओरिएंटर इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. विमा कंपनीकडून ॲड. सत्यजीत लोणकर यांनी बाजू मांडली. यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश शाम चांडक आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी सहकार्य केले. अपघातात अपंगत्व आलेल्या पक्षकाराला कमी कालावधीत न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे. न्यायाधीशांनी न्यायालयीन कक्ष सोडून अपघातात अपंगत्व आलेल्या महिला पक्षकाराची भेट घेतली. दावा निकाली काढून महिला दिलासा दिला. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेची प्रचिती न्यायाधीशांना दिली, असे ॲड. निनाद बागमार यांनी सांगितले.