पुणे : पुणे महापालिकेच्या जम्बो करोना रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या आले, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला. त्यामुळे झालेल्या गोंधळात त्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी जम्बो करोना रुग्णालयात घोटाळा झाल्याची तक्रार दिली. तिथून ते  महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते, याची कुणकुण शिवसैनिकांना लागताच सुमारे १०० शिवसैनिक महापालिका आवारात दाखल झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवले, ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही, निवडक प्रकरणावर का चर्चा करता,’ असा जाब त्यांनी विचारला. त्यावर सोमय्या यांनी ‘मला माहिती द्या, मी त्याबद्दलही प्रशासनाशी बोलतो’, असे सांगितले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
pune crime news
पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे

 दरम्यान, जमलेले शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्यांच्या दिशेने आले. सुरक्षारक्षकांनी घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवून धक्काबुक्कीला सुरुवात केली. त्यामुळे परतताना पायऱ्या उतरताना सोमय्या खाली पडले. 

या घटनेबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी आम्ही सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनीच त्यांना धक्काबुक्की केली, असा दावा केला. सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी  पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

सोमय्यांचे ट्वीट

पुणे महापालिकेच्या परिसरात माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला, अशा शब्दांत ट्वीट करत सोमय्यांनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला केला.

जशास तसे उत्तर देऊ – चंद्रकांत पाटील</p>

हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत. भारतीय जनता पक्ष कायद्याने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिला.

Story img Loader