पुणे : सध्या राज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. दसरा मेळाव्यात देखील त्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले . अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या वडगाव सहानी येथील ठाकरे – शिंदे यांच्या लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत असुन यांचा शुभ विवाह सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कटुता विसरून पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा शिंदे कुटुंबाने या निमित्ताने व्यक्त केली आहे. 

जुन्नरच्या वडगाव सहानी येथील विशाल शिंदेचा आंबेगाव येथील साल गावच्या अनुराधा ठाकरे हिच्याशी विवाह ठरला आहे. या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहेत. त्यांची सोयरीक होत आहे. सध्या राज्यातील राजकारणात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटात कटुता वाढताना दिसत आहे. एकमेकांवर टोकाचे आरोप केले जात आहेत. जुन्नर येथील हा विवाह सोहळा दोन्ही गटातील नेत्यांना सूचक इशारा देणारा ठरतो आहे. शिंदे कुटुंबातील कट्टर शिवसैनिक असलेले खंडेराव विश्राम शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. त्यांनी हा विवाह सोहळा जुळवला आहे. लग्न पत्रिकेवरील ठाकरे – शिंदे यांची नवे असलेल्या विवाह सोहळ्याची लग्न पत्रिका अवघ्या पुणे जिल्ह्यात व्हायरल झाली आहे.

Asha Bhosle Said This Thing About Eknath Shinde
Asha Bhosle : आशा भोसलेंनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, “बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली तशी…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Solapur shivsena Eknath shinde
सोलापूर : राज ठाकरे यांच्या स्वागताला शिवसेना शिंदे गटाचे नेते
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
Eknath Shinde aims to make thane the number one city in few years
ठाणे शहराला प्रथम क्रमांकाचे शहर बनवायचयं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हेही वाचा : ‘ठाकरे, शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी’; अजित पवार यांचे मत

शिंदे कुटुंबातील नवरदेव विशाल याने जसे आम्ही ठाकरे कुटुंबाशी जुळवून घेतले आहे . तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी हेवेदावे विसरून एकत्र यायला हवे असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या विवाह सोहळ्याला स्थानिक आमदार, खासदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा विवाह सोहळा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या शनिवारी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे कुटुंब या निमित्ताने एकत्र येणार आहेत त्यांचे पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. यामिनित्ताने तरी दोन्ही गटातील कटुता कमी होणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader