पुणे : कल्याणीनगर अपघातानंतर चर्चेत आलेल्या पुण्यातील बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांची बदली करण्यात आली. परदेशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी दिला. पुण्यातील बाल न्याय मंडळाचे कामकाज प्रमुख न्यायदंडाधिकारी परदेशी आणि डॉ. एल. एन. धनावडे आणि के. टी. थोरात पाहतात. धनावडे आणि के. टी. थोरात शासन नियुक्त सदस्य आहेत.

हेही वाचा >>> पुणे : शहरात कडक बंदोबस्त, कोरेगाव पार्क भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

cases, MP, MLA, High Court,
खासदार, आमदारांच्या खटल्यांचा तपशील द्या, उच्च न्यायालयाचे सर्व जिल्ह्यांच्या प्रधान न्यायाधीशांना आदेश
contempt case against state co operation minister dilip walse patil in nagpur bench
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अवमानाचा खटला; सहा आठवड्यांत जबाब नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
High Court reprimanded the government in Nagpur Reform Scheme Plot Scam
१७ वर्षांपासून एका फाईलवर कसे बसू शकता? भूखंड घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
Special Court decision to grant bail to Arvind Kejriwal
केजरीवाल यांना जामीन; विशेष न्यायालयाचा निर्णय, ४८ तासांच्या स्थगितीसही नकार
Arvind Kejriwal judicial custody extended till July 3
केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ
Transfer, officer, Ravi Rana,
आमदार रवी राणांच्या दबावाखाली अधिकाऱ्याची बदली, उच्च न्यायालयाने नगररचना विभागाला ठोठावला दंड
Eknath Shinde assured the Government Employees Association that the retirement age of government employees is 60
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६०; मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटना आश्वस्त
Judicial custody, doctors,
ससूनमधील डॉक्टरांसह चौघांना न्यायालयीन कोठडी, कल्याणीनगर अपघात प्रकरण

परदेशी यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची बदली करण्यात आली. त्यांची बदली नियमित स्वरूपाची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले हाते. मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यानंतर त्याला वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध आणि १५ दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयावर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती.