तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालीन स्टॅलिन सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन  यांनी सनातन धर्मावर एक वादग्रस्त वक्तव्य  केलं होतं. यावर कालीचरण महाराज यांनी प्रतिउत्तर दिल आहे. हिंदूमध्ये एकता नाही. ते जातीयवाद, वर्ण आणि प्रांत वादात विभागले आहेत. म्हणूनच अशा प्रकारे काही नालायक हिंदुत्वावर बडबड करत आहेत. अशी टीका कालीचरण महाराज यांनी केली आहे. ते पिंपरी- चिंचवड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच इंडियाला ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ म्हणूनच संबोधले पाहिजे असे देखील त्यांनी म्हटले आहे.  

हेही वाचा >>> दहा वर्षांच्या अविरत सेवेनंतर ‘राधा’ श्वानाचा मृत्यू

कालीचरण महाराज म्हणाले, इंडियाला भारत म्हणा, हिंदुस्थान म्हणा, पण इंडिया म्हणू नये.. आम्हाला भारत किंवा हिंदुस्थान पाहिजे. शरद पवार यांनी नुकतंच इंडिया हे नाव कोणी हटवू शकत नाहीत या प्रश्नवर बोलताना ते म्हणाले की, आपापली मतं आहेत… आम्हालाही वाटायचं ३७० कलम आणि राम मंदिर होणार नाही पण झालं. असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, हिंदू जागृत होत असल्याने पुण्येश्वर मंदिर प्रकरण पुढे येत आहेत. ही आताशी सुरुवात झाली आहे. जो स्पष्ट हिंदूंच्या हिताची गोष्ट करतो त्याच व्यक्तीला मतदान करा तरच हिंदू सुरक्षित राहतील राजकारणात पर्याय नाही.

हेही वाचा >>> पुणे: कस्टमने जप्त केलेला माल स्वस्तात देण्याचे आमिष; पुण्यातील व्यापाऱ्याची ६६ कोटींची फसवणूक

धर्म रक्षणासाठी राजकारण अत्यंत महत्त्वाच आहे. हिंदूंमध्ये एकत्रितपणा नाही, एकी नाही. सडक्या जातीवादात, वर्ण वादात आणि प्रांत वादात विभागले आहेत. म्हणूनच असे काही नालायक लोक हिंदुत्वावर बडबड करतात. हिंदुस्थानमध्येच खातात आणि त्याच ताटात छेद करणारी ही लोक आहेत. यांना सत्तेत बसवणारे जातीयवादात अडकलेले हिंदूच आहेत. हे टोमॅटो आणि पेट्रोलच्या भावामध्ये अडकलेले आहेत. हिंदू सडक्या जातीयवादात अडकला नसता तर अशा पद्धतीने वक्तव्य करण्याची कोणाची हिम्मत झाली नसती. असे ही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader