लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलासह दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ.अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर ,शिपाई अतुल घटकांबळे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले मंजुरी पत्र विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी गुरुवारी दाखल केले. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी आरोपी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, ससूनमधील डॉक्टरांसह सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चिती करून सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी वाचा- नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांवर गुन्हा, नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल दाम्पत्याने ससूनमधील डॉ. तावरे, हाळनोर यांना पैसे दिले. मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केले. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी यांच्यासह ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट

आरोप निश्चितीनंतर सुनावणी

डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, घटकांबळे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यास परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १९७ प्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने आरोपींविरोधात फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली. आरोप निश्चित झाल्यावर सुनावणी सुरू होणार आहे, असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले.

Story img Loader