पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दिली.

हेही वाचा – अमोल घटुकडे राज्यात प्रथम, एमपीएससीतर्फे ‘पीएसआय’ची गुणवत्ता यादी जाहीर

mbay high court warns sit over Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : जनक्षोभाला बळी पडून घाईने आरोपपत्र दाखल करू नका, उच्च न्यायालयाने एसआयटीला बजावले
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
High Court, CID Investigation, Ritu Malu, Hit and Run, Nagpur Police, Tehsil Sub Inspector Allegations, Police Protection, Medical Examination, CCTV Footage, latest news
रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
Badlapur School KG Girl Sexual
पोलिसांना जबाबदारीचा विसर! बदलापूर अत्याचारप्रकरणाच्या हाताळणीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
constitution
संविधानभान: संसदीय कामकाजाचे स्वरूप
illegal radhai building latest marathi news
डोंबिवलीतील बेकायदा राधाई भुईसपाट करण्यास न्यायालयाची दोन आठवड्यांची मुदत
kirit somaiya
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार? कथित आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले…

हेही वाचा – पीकविम्यासाठी १.६५ कोटी अर्ज, राज्यातील १.१० कोटी हेक्टरवरील पिके संरक्षित

पोर्शे अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट करणे आणि चालकावर दबाव आणून खोटा जबाब द्यायला लावणे, त्याला डांबून ठेवणे, याप्रकरणी अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पोर्शे मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले आहे. तब्बल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल इत्यादी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत. आता हे खटले जलद गतीने चालविण्याची मागणी लवकरच न्यायालयाकडे करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केले.