दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार येत्या २४ एप्रिलला पुण्यात येणार असून, त्या दिवशी त्याचे विविध कार्यक्रम शहरात ठेवण्यात आले आहेत. ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन आणि पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गेल्या महिन्यातच समितीतर्फे कन्हैयाला पुणे भेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळीच त्याने पुण्यात येण्याचे निश्चित केले होते. कन्हैयाच्या पुणे दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २४ एप्रिलला तो एफटीआयआयलाही भेट देणार असून, त्याची सभाही ठेवण्यात येणार आहे. कन्हैया कुमारच्या पुण्यातील सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्याच्या कार्यक्रमांसाठी पोलिसांकडे परवानगीही मागण्यात आली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा