पुणे : संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कर्नाटक सरकारतर्फे युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार  स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारा विराज सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला आहे.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. बसवराज राजगुरू यांच्या नावाने कर्नाटक सरकारतर्फे १८ ते २५ या वयोगटातील कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. धारवाड येथे २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात विराजला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. रोख रक्कम २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.  कुमार गंधर्व यांचे शिष्य आणि ज्येष्ठ गायक पं. मधुप मुदगल यांना या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.

Story img Loader