बदाम, सुंदरी, लालबाग जातीच्या आंब्यांची आवक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटक हापूसची आवक सुरू झाली आहे. कर्नाटक हापूसच्या एका डझनाला ७०० ते ८०० रुपये असा भाव घाऊक बाजारात मिळाला.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील फळबाजारात कर्नाटक हापूसबरोबरच कर्नाटकातील बदाम, सुंदरी, लालबाग या जातीच्या हापूसची आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कर्नाटक हापूसची २० डझन, बदाम आंब्याची ३५० ते ४०० किलो, सुंदरी आंब्याची १५० किलो, लालबाग आंब्याची १०० किलो अशी आवक झाल्याची माहिती फळबाजारातील व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. कर्नाटक हापूसचा हंगाम सुरू होण्यास आणखी दोन महिने लागणार आहेत. कर्नाटकातील तुमकुर भागातून आंब्याची आवक झाली. कर्नाटक हापूसची आवक साधारण फेब्रुवारी महिन्यात सुरू होते, असेही त्यांनी सांगितले.

कर्नाटक आंब्यांचे घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे आहेत. कर्नाटक हापूस एक डझन- ७०० ते ८०० रुपये, सुंदरी- ५० रुपये किलो, बदाम- ७० ते ८० रुपये किलो, लालबाग- ६० ते ८० रुपये किलो