कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रविंद्र धंगेकराना उमेदवारी जाहीर झाली असून सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यापूर्वी रविंद्र धंगेकरानी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. तसेच मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केले. यावेळी रविंद्र धंगेकर यांना शैलेश टिळक यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, मला काल रात्री नाना पटोले यांचा फोन आला. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा असून त्याच्या तयारीला लागा असं म्हणाले. त्यानुसार मी केसरी वाडा येथे मुक्ता टिळक यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेलादेखील अभिवादन केले. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी भावना पुणेकर नागरिकांची होती. मात्र भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. ही नाराजी शहरातील नागरिकांमध्ये आहे. भाजपा ही निवडणुक मतदारांना गृहीत धरून लढवित आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक भाजपाला नक्कीच जागा दाखवतील.

हेही वाचा – Kasba Assembly By-Election : “…याचे निश्चितपणे परिणाम दिसणार” काँग्रेस नेते रोहित टिळकांचं सूचक विधान!

कसबापेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यासाठी भाजपाकडून कसबापेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने, तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.