पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत असल्याने भाजपचे अनेक मंत्री कसब्याच्या रिंगणात उतरले असताना आता ‘कसब्या’ची सर्व सूत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली आहेत. फडणवीस यांनी बुधवारी रात्री सात तास बैठक घेत उद्योजक, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, व्यावसायिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

पोटनिवडणुकीसाठी मनधरणी करण्याची वेळ भाजपवर आल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आवाहन महाविकास आघाडीने धुडकावून लावले होते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी भाजपविरोधात ताकद लावली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचा परिणाम राज्यातील आगामी निवडणुकांवर होणार असल्याने राज्यातील जनतेचेही लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
vidhan sabha election 2024
उमेदवारांच्या पारंपरिक प्रचारामुळे प्रिंटिंग व्यवसाय तेजीत
Samvadini Group, Social Transformation,
शहरबात… कृतीतून बोलणारी ‘संवादिनी’
ajit pawar and sharad pawar
तीन दिवस मुक्काम पोस्ट बारामती : औचित्य दिवाळी; उद्दिष्ट प्रचार!
in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले
awareness campaign by fire brigade during diwali
दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पोटनिवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज उतरली आहे. रात्रीपर्यंत भेटी-गाठींचा धडाका, नेत्यांच्या सुकाणू समितीच्या बैठका, आजी-माजी आमदारांवर मतदारसंघातील प्रभागांची जबाबदारी, ज्ञाती संस्थांशी संपर्क असे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले असतानाच उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘कसब्या’कडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री अचानक पुणे दौरा केला. कसब्याचा हुकमी एक्का अशी ख्याती असलेल्या आणि सर्व घटकांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या खासदार गिरीश बापट यांची त्यांनी भेट घेतली.

प्रकृतीच्या कारणास्तव प्रचार करणार नसल्याचे बापट यांनी जाहीर केल्यानंतर फडणवीस यांना त्यांची भेट घ्यावी लागली. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघासंदर्भात शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी फडणवीस यांनी रात्री पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील मानाचे गणपती प्रमुख, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिक आणि काही उद्योजकांचीही भेट घेत त्यांची मनधरणी केली. या बैठकीत विजयाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या रणनीतीबाबतही फडणवीस यांनी संबंधितांना सूचना केली.

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही ३० वर्षे भाजपने कसबा मतदारसंघ आपल्याकडे राखला होता. महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्रित लढणार असल्याने बालेकिल्ल्यात मोठय़ा मताधिक्याने विजय मिळविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे राहिले आहे. त्यातच ब्राह्मण उमेदवाराला संधी नाकारल्याने ब्राह्मण समाजही नाराज झाल्याची चर्चा आहे. या सर्व कारणांमुळे भाजपपुढील अडचणी वाढल्या आहेत.

चिंता काय?

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही ३० वर्षे भाजपने कसबा मतदारसंघ आपल्याकडे राखला. परंतु या पारंपरिक मतदारसंघात पराभव स्वीकारण्याची वेळ आल्यास ती नामुष्की ठरणार असून राज्यातील राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवरही त्याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.