Pune Bypoll Election Result 2023: गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल १० हजार मतांनी पराभव केला आहे.

‘बिग बॉस मराठी’मधून प्रसिद्धी मिळवलेले अभिजीत बिचुकलेंनीही कसबा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. कसबा पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या बिचुकलेंना केवळ ४८ मतं मिळाली आहेत. पहिल्या फेरीत बिचुकलेंना केवळ चार मतं पडली. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत त्यांना शून्य मतं मिळाली. कसबा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकलेंना मतांची हाफ सेंच्युरीही पूर्ण करता आलेली नाही.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Vote Karega Kulaba campaign to increase voter turnout print politics news
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ‘व्होट करेगा कुलाबा’ मोहीम; सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त अधिकाऱ्यांचा पुढाकार
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

हेही वाचा>> Kasba Bypoll Result 2023 : रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कसब्यातील परीवर्तन…”

कसबा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्याचबरोबर अभिजीत बिचुकलेंचीही जोरदार चर्चा होती. बिचुकलेंनी कसब्यात जोरदार प्रचार केला होता. पोटनिवडणुकीसाठी त्यांना कपाट हे चिन्ह मिळालं होतं. कवी मनाचे नेते म्हणून ओळख असलेल्या अभिजीत बिचुकलेंनी पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नांवर भर दिला होता. एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर बिचुकलेंनी त्यांची भेटही घेतली होती. बिचुकलेंनी त्यांच्या पत्नीला राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

हेही वाचा>> Kasba Bypoll Election 2023: कसबा आमदार रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास! जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

अभिजीत बिचुकलेंबरोबरच ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष असलेल्या आनंद दवे यांचीही कसब्यात चर्चा होती. आनंद दवेंना कसबा पोटनिवडणूकीत २९६ मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे इतर सर्व अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं मिळाली आहेत. कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत नोटाला एकूण एक हजार ३९७ मतं मिळाली आहेत.