Kasba Chinchwad Vote Counting Updates, 02 March 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल याची आम्हाला खात्री वाटत होती. मात्र तिकडे पराभव झाला आहे. त्याचं आम्ही आत्मचिंतन नक्की करू. २०२४ ला कसबा पुन्हा जिंकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?

08:01 (IST) 3 Mar 2023
राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? अश्विनी जगताप यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाल्या…

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६,०९१ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना ३७ व्या फेरीअखेर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली. त्यामुळे कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपाला फायदा झाल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता अश्विनी जगताप यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

सविस्तर वाचा…

08:00 (IST) 3 Mar 2023
VIDEO: चिंचवडमधील विजयानंतर माय-लेकींना अश्रू अनावर, म्हणाल्या, “दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप…”

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीने लक्ष्मण जगतापांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी माय-लेकींना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थितांनी 'अमर रहे, अमर रहे, लक्ष्मण जगताप अमर रहे' अशा घोषणा दिल्या.

सविस्तर वाचा…

08:00 (IST) 3 Mar 2023
“…म्हणून कसबा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही पराभव पत्करावा लागला. यानंतर महाविकासआघाडीतील विविध नेत्यांकडून भाजपावर टोलेबाजी सुरू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कसब्यातील भाजपाच्या पराभवावर भाष्य केलं आहे. तसेच भाजपाचा पराभव का झाला याचं कारण सांगितलं. त्यांनी अकोला जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा…

07:57 (IST) 3 Mar 2023
“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान

महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी दिली असती तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं. अशी खदखद बंडखोर राहुल कलाटेंनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी पिंपरीतील वाकड येथे बोलत होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार, बंडखोर राहुल कलाटेंची जोरदार चर्चा झाली. आज झालेल्या मतमोजणीत भाजपा च्या अश्विनी लक्ष्मण जगताप या ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या.

सविस्तर वाचा…

17:43 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: बंडखोरीचा फटका बसला – नाना काटे

सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. पण बंडखोरीचा फटका नक्कीच बसला आहे. कारण कलाटेंना झालेलं मतदानही मविआचंच आहे. त्यातली काही मतं वंचित बहुजन आघाडीची असू शकतील. मतदान होण्याच्या दोन दिवस आधी सत्ताधाऱ्यांनी आमचे बरेच कार्यकर्ते पोलीस बळ वापरून उचलले होते. त्यानंतर पैशांचा मोठ्या प्रमाणावर इथे वापर झाला. सर्व कार्यकर्ते संपूर्ण चिंचवड मतदारसंघात पुन्हा काम करतील आणि आम्ही जोमानं काम करू. सहानुभूती असती तर पैसे वाटलेच नसते. त्यांना पराभवाची भीती होती म्हणून त्यांनी पैसे वाटले – नाना काटे, मविआचे पराभूत उमेदवार

17:12 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित

मतमोजणीच्या अवघ्या काही फेऱ्या शिल्लक असताना अश्विनी जगताप यांचा पिंपरी-चिंचवडमधून विजय निश्चित मानला जात आहे. त्याच्याकडे असणारी मतांची आघाडी आता भरून काढणं नाना काटेंसाठी अशक्य असल्यामुळे आता जगताप यांच्या विजयाची औपचारिक घोषणाच शिल्लक आहे.

17:03 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप यांच्याकडे ३४,३२६ मतांची आघाडी

अश्विनी जगताप – 1,28,216

नाना काटे – 93,890

राहुल कलाटे – 42,139

16:54 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: ३३व्या फेरीची चिंचवड निवडणुकांची आकडेवारी

– अश्विनी जगताप – ३३४६ भाजप १,०६९ लीड – एकूण लीड – २९,४६५

– नाना काटे – २२७७ एनसी

– राहूल कलाटे – ६२५ अपक्ष

16:47 (IST) 2 Mar 2023
Video: कसबा, चिंचवड निकालांचा भाजपासाठी नेमका अर्थ काय? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही तीन विरुद्ध एक अशीच लढत झाल्यास निकाल काय असेल? याची चुणूकच कसबा आणि पिंपरी- चिंचवड पोटनिवडणुकीत पाहायला मिळाली.

व्हिडीओ पाहाण्यासाठी क्लिक करा!

16:45 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: ३२व्या फेरीनंतर अश्विनी जगताप ३२,५४५ मतांनी आघाडीवर!

पिंपरी चिंचवड – ३१ फेरी

– अश्विनी जगताप – ४६६५ भाजप १,९६० लीड – एकूण लीड – २५,४४० (एकूण मतं – १,२१,५८४)

– नाना काटे – २७०५ (८९,०३९)

– राहूल कलाटे – ८७१ (४०,५००)

16:34 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: बिचुकले नाही, जनता चुकली – अभिजित बिचुकले

बिचुकले चुकले नाही, जनता चुकली. हेमंत रासनेंचा किती पैसा गेला. त्यांचाही पराभव झाला. मी काही राजकारणात त्यांच्यापेक्षा मोठा नाहीये. फक्त माझी मतं ठाम असतात. – अभिजित बिचुकले

16:16 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: कलाटेंच्या बंडखोरीमुळे फायदा – अश्विनी जगताप

राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे मला नक्कीच फायदा झाला आहे – अश्विनी जगताप

16:15 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप अधिवेशनाला कधी येणार?

माझे वरीष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनाला येईन – अश्विनी जगताप

16:14 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: पराभवाचं आत्मचिंतन करू – बावनकुळे

कसब्याच्या जागेवर आम्ही कापराभूत झालो याबाबत आम्ही आत्मचिंतन करु,अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिली. चिचवडची निवडणूक आम्ही जिंकलो.  मात्र कसबात पराभवझाला. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे तेथील विकास आम्ही करणार आहे करु, असे बावनकुळे म्हणाले.

निवडणुकीत पैसे वाटल्याच्या आरोपाचे बावनकुळे यांनी खंडण केले. अजित पवार यांनी निवडणुकीच्या आधी व्हिडियो दाखवायला पाहिजे होते. निवडणुकी नंतर दाखविण्याचे कारण काय हे मला समजले नाही. मुळात आमची परंपरा पैसा वाटून मत मागायची नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसा पासून सत्ता हे केवळ महाविकास आघाडीचे काम असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

16:08 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: राहुल कलाटेंमुळे खरंच मविआचा पराभव झाला?

राहुल कलाटेंनी फक्त काटेंचीच नाही, तर भाजपाचीही मतं घेतली. ते सांगतात ते चुकीचं आहे. आयटी पार्कमधली मतं कलाटेंनी घेतली आहेत. त्यामुळे असं म्हणता येत नाही की राहुल कलाटेंना पडलेली मतं फक्त त्यांचीच आहेत. त्यानं फरक पडत नाही. पण तिथे त्यांचा पराभव झालाय हे त्यांनी मान्य केलं पाहिजे – चंद्रशेखर बावनकुळे

16:04 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: ३०व्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांच्याकडे मोठी आघाडी

– अश्विनी जगताप – ३५६९ भाजप ३९ लीड – एकूण लीड – २३,४८०

– नाना काटे – १३७९ एनसी

– राहूल कलाटे – ३५३० अपक्ष

14:48 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये २४ फेरीची आकडेवारी…

– अश्विनी जगताप – ४३१५ भाजप – ०० ची लीड – एकूण लीड – ९९३७

– नाना काटे – ३३३६ एनसी

– राहूल कलाटे – ३५१ अपक्ष

14:36 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: अश्विनी जगताप यांना ८९५८ ची आघाडी

अश्विनी जगताप – ८०१७४

नाना काटे – ७१२१६

राहुल कलाटे – २८४१५

14:34 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: २३व्या फेरीच्या शेवटी चिंचवडधली आकडेवारी…

पिंपरी चिंचवड – २३ फेरी

– अश्विनी जगताप – २७७० भाजप – ०० ची लीड – एकूण लीड – ८९५८

– नाना काटे – ३४७२ एनसी

– राहूल कलाटे – २७० अपक्ष

14:15 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: २१व्या फेरीअखेर चिंचवडमधली आकडेवारी…

पिंपरी चिंचवड – २१ फेरी

– अश्विनी जगताप – २८६१ भाजप – १५९ ची लीड – एकूण लीड – १०,२५१

– नाना काटे – २७०२ एनसी

– राहूल कलाटे – ३३९ अपक्ष

14:01 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: मनोहर पर्रीकरांचाही भाजपाने तसाच वापर करून घेतला होता – उद्धव ठाकरे

टिळकांच्या घराण्याचा वापर करून त्यांनी त्यांना बाजूला करून टाकलं. तो राग मतदारांच्या मनात होता. गिरीश बापटांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. त्यांचा फोटो मी पाहिला की ऑक्सिजनच्या नळ्या लावून त्यांना प्रचाराला आणलं. मनोहर पर्रीकरांकडूनही तसाच प्रचार करून घेतला, पण त्यानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली – उद्धव ठाकरे

13:57 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: …जर कसबा भ्रमातून बाहेर पडू शकत असेल, तर … – उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

कसब्यामध्ये पोटनिवडणूक जिंकल्यानंतर मला आनंद नक्कीच झाला आहे. एवढ्या वर्षांच्या एका भ्रमातून कसबा मतदारसंघ जर बाहेर पडत असेल, तर देश बाहेर पडायला काहीच अडचण नाही – उद्धव ठाकरे

13:19 (IST) 2 Mar 2023

Kasba Bypoll Election 2023: कसबा आमदार रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास! जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

पुण्यातील कसबा भागाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घ्या,

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

13:19 (IST) 2 Mar 2023
२८ वर्षांनी कसब्यात भाजपाला पराभूत करणारे रवींद्र धंगेकर कोण आहेत?

Kasba Election Result: मनसे, शिवसेना आणि आता काँग्रेसकडून लढविली निवडणूक; २८ वर्षांनी कसब्यात भाजपाच्या गडाला सुरूंग लावणारे रवींद्र धंगेकर कोण आहेत?

सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

13:15 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: २०व्या फेरीअखेर चिंचवडमधली आकडेवारी…

पिंपरी चिंचवड – विसावी फेरी

– अश्विनी जगताप – ४२३५ भाजप – ०० ची लीड – एकूण लीड – १०९२

– नाना काटे – ५७०२ एनसी

– राहूल कलाटे – ९३८ अपक्ष

13:06 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: लोक मग जिथे दाबायचं तिथे बटण दाबतात – अजित पवार

ज्या प्रकारे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना मतदान करायला घेऊन आले. ज्याप्रकारे गिरीश बापट संसदेचं अधिवेशन चालू असताना जाऊ शकले नाही. ते विश्रांती घेत होते. तरीही त्यांना कशाप्रकारे बाहेर यायला सांगितलं आणि मेळावा घ्यायला सागितलं हे बरोबर नाही. तुमचे उमेदवार जिंकण्यासाठी दुसऱ्याच्या आरोग्याचाही विचार करणार नाही का? हे लोकांना पटत नाही. मग लोक न बोलता जिथं बटण दाबायचं तिथे दाबतात – अजित पवार

13:03 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला!

मुख्यमंत्र्यांनी कसब्यामध्ये रोडशो केला. राज्याचा मुख्यमंत्री कधी रोड शो करतो का? मी असं म्हटलं तर ते म्हणाले मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. सर्वसामान्यांना भेटणार. आता सर्वसामान्यांना भेटूनही सर्वसामान्यांनी पराभव केला हे लक्षात घ्या – अजित पवार

12:59 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: कलाटे आणि काटेंची मतं एकत्र केली तर… – अजित पवार

राहुल कलाटे आणि नाना काटेंची मतं एकत्र केली, तर ती भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ, पुढच्या निवडणुकीत आमच्यामध्ये बंडखोरी होता कामा नयेत, ही काळजी घेणं गरजेचं आहे – अजित पवार

12:58 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: १९व्या फेरीअखेर चिंचवडमधील आकडेवारी…

पिंपरी चिंचवड – एकोणीसावी फेरी

– अश्विनी जगताप – २६४७ भाजप – ३७६ ची लीड – एकूण लीड – ११४५९

– नाना काटे – २२७१ एनसी

– राहूल कलाटे – ८४४ अपक्ष

12:57 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: मनसेबाबत अजित पवारांचा मोठा दावा!

मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं की रवींद्र धंगेकर उमेदवार आहेत. आम्ही त्यांचा प्रचार करणार. तुम्हाला पक्षातून काढायचं तर काढा. पण आम्ही मागे हटणार नाही. त्यांचे कार्यकर्ते मला पुण्यात भेटले. त्यांनी सांगितलं की आम्हाला रवीला विजयी करायचं आहे – अजित पवार

(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता