Kasba Chinchwad Vote Counting Updates, 02 March 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल याची आम्हाला खात्री वाटत होती. मात्र तिकडे पराभव झाला आहे. त्याचं आम्ही आत्मचिंतन नक्की करू. २०२४ ला कसबा पुन्हा जिंकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?
कसब्यात मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना नवव्या फेरीअखेरीस ४७०० मतांची आघाडी
पिंपरी चिंचवड – सातवी फेरी –
– अश्विनी जगताप – ३८८८ भाजप – ७८० ची लीड – एकूण लीड – ४०९१
– नाना काटे -३१०८ एनसीपी
– राहूल कलाटे – १०९८ अपक्ष
पिंपरी चिंचवड – सहावी फेरी –
अश्विनी जगताप – ४००७ भाजप – ३७२ ची लीड – एकूण लीड – ३३४१
नाना काटे -३६३५ एनसीपी
राहुल कलाटे – २१४१ अपक्ष
राज की बात आता समोर येईलच. राजकारणात आजची गोष्ट उद्या उघड होतेच. दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी आणि आपापसातील वाद हे प्रकार होत होते. जनता त्यांच्या पैशाला भीक न घालता माझ्याकडे चांगला पर्याय म्हणून पाहतील असं वाटत होतं. निम्म्या फेऱ्या झाल्यानंतर चित्र लक्षात येईल – राहुल कलाटेंचं सूचक विधान
कालच माझी पत्नी म्हणाली की तुम्हाला आता सगळं अवघड आहे. तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. तुम्हाला खूप काम करायचं आहे – रवींद्र धंगेकर
विरोधकांनी वाटलेले पैसे लोकांनी घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले – रवींद्र धंगेकर
कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ८६ मतदारांनी कोणत्याही उमेवाराला पसंती दर्शविली नाही. या मतदारांनी नोटा या पर्यायाला पसंती दिली आहे.
दुस-या फेरीतहही किती मतदार नोटाला पसंती देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची आघाडी चौख्या फेरीअखेरही कायम आहे.
अश्विनी जगताप २७७५
नाना काटे २१५९
राहुल कलाटे १०५८
चौथ्या फेरीत जगताप यांच्याकडे ६१६ मतांची आघाडी
कसब्यामध्ये पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकरांकडे ५ हजार मतांची आघाडी आली आहे. रवींद्र धंगेकरांना मिळालेल्या मतांचा आकडा १४ हजाराच्या वर गेला आहे.
अश्विनी जगताप म्हणतात, “ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी..!”
कसब्यात अभिजित बिचुकलेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ४ मतं मिळाली असून हिंदू महासभेचे आनंद दवे यांना १२ मतं मिळाली आहेत.
दुसऱ्या फेरीमध्ये मविआचे रवींद्र धंगेकर कसब्यातून आघाडीवर आहेत. धंगेकरांना ५ हजार तर भाजपाच्या हेमंत रासनेंना २८०० मतं मिळाली आहेत.
चिंचवडमध्ये दुसऱ्या फेरीमध्येही अश्विनी जगताप आघाडीवर आहेत. अश्विनी जगताप यांना ३८२९, नाना काटेंना ३६०२ तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना १३७२ मतं मिळाली आहेत. आता अश्विनी जगताप यांची आघाडी ६७६ मतांची झाली आहे.
या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. मी पोस्टल मतांमध्ये कायम आघाडीवर राहतो. आता शेवटच्या फेरीपर्यंत माझी अशीच आघाडी राहणार. माझं लीड २ हजार मतांच्या पुढे जाईल. मतांची कोणतीही विभागणी होणार नाही. मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपला – रवींद्र धंगेकर
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर २२०० मतांनी पुढे…
चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांना ४१६७ मतं, मविआच्या नाना काटेंना ३६४८ मतं तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना १६७४ मतं… अश्विनी जगताप यांच्याकडे ५१९ मतांची आघाडी…
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर पोस्टल मतदानात पुढे…
कसबा आणि पिंपरी चिंचवड मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…
Kasba Chinchwad Bypoll Election: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस!
— LoksattaLive (@LoksattaLive) March 2, 2023
पुण्यात कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे.
वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर > https://t.co/JKsIEop4Dq#Maharashtra #Pune #ElectionResults #KasbaElection #PimpriChinchwad pic.twitter.com/zdPAzyMgzf
चिंचवडमध्ये पोस्टल मतमोजणीत भाजपा उमेदवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत.
ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं.
भाजपानं यावेळी जाती-धर्मावर केली. पैसे वाटले. काही लोकांना पैसे वाटून बाहेर जायलाही सांगितलं. पण कसब्यातले मतदार ठाम होते. त्यांनी रवींद्र धंगेकरांना भरभरून मतदान केलं आहे. त्यांचा १० हजार मतांनी विजय होईल – रुपाली ठोंबरे पाटील
रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित आहे. कसब्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आता कडक इस्त्रीचे कपडे घालणारा आमदार नको. काम करणारा आमदार हवाय. विधानसभेत प्रश्न मांडणारा आमदार हवाय. त्यामुळे धंगेकरांचा विजय निश्चित आहे. माणसं तोडायची, कुटुंबं तोडायची यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आत्तापर्यंत एकत्र लढत नव्हते. पण यावेळी ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकजुटीनं काम केलंय. त्यामुळे धंगेकरांचा विजय निश्चित आहे – रुपाली ठोंबरे पाटील
कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम येथे 8 वाजता सुरू झाली आहे.त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार असून ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आले आहे. टपाली आणि ईटीपीबीएसची सुरुवातीला मोजणी होणार आहे.त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
हिंदू महासंघाची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. या निवडणुकीने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे. आमचा राजकीय पक्ष आहे. आमची उमेदवारी उभी केल्यामुळे कुणाचं नुकसान किंवा फायदा होत असेल, तर त्याचा विचार आम्ही करण्याचं कारण नाही. आमचा विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहे हे नक्की – आनंद दवे, हिंदू महासभेचे उमेदवार
पुण्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रचारात फडणवीसांनी हिंदुत्वासाठी मतदान करा असं आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कसब्यात मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त…
मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल – रवींद्र धंगेकर
आम्ही खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ. काँग्रेसकडे ग्राऊंड रिअॅलिटिची कोणतीही माहिती नव्हती – हेमंत रासने