Premium

Kasba Chinchwad Bypoll Election Results: २०२४ मध्ये कसबा मतदारसंघ पुन्हा जिंकणार, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Pune Bypoll Election Result 2023 : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत

nana kate on ashwini jagtap chinchwad bypoll election
नाना काटेंचा भाजपावर गंभीर आरोप (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kasba Chinchwad Vote Counting Updates, 02 March 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेल्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज मतमोजणीचा दिवस आहे. कसब्यातली सर्व २० फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजपाच्या हेमंत रासनेंनी आपला पराभव मान्य केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल याची आम्हाला खात्री वाटत होती. मात्र तिकडे पराभव झाला आहे. त्याचं आम्ही आत्मचिंतन नक्की करू. २०२४ ला कसबा पुन्हा जिंकू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Kasba Peth Chinchwad Bypoll Election Result 2023 Live Updates in Marathi: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस, मतदारांचा कौल कुणाला?

07:10 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: भाजपाला रवींद्र धंगेकरांची एकहाती टक्कर!

भाजपाचे हेमंत रासने यांच्याविरोधात कसब्यातून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून या दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. मंगळवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी कसबा भाजपाच्या हातून जातेय असं विधान केल्यामुळे या जागेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

07:09 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात उमेदवारीवरून राजकारण

कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून दिल्या गेलेल्या उमेदवारीवरून मोठं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा झाली.

07:07 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान!

चिंचवडमध्ये ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून त्यापैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५०.४७ टक्के मतदान झालं आहे.

07:06 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये तिरंगी लढत

भाजपा उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार.

06:43 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल!

भारतीय निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या संकेतस्थळावर सगळ्यांना फेरीनिहाय मतांची आकडेवारी पाहाता येणार आहे.

06:42 (IST) 2 Mar 2023
Chinchwad Bypoll Election Result: चिंचवडमध्ये मतमोजणीच्या ३७ फेऱ्या

चिंचवडच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ आणि टपाली मतपत्रिकांसाठी एक, असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत.

वाचा सविस्तर

06:41 (IST) 2 Mar 2023
kasba bypoll election result: कसब्यात मतमोजणीच्या २० फेऱ्या

कसब्याच्या मतमोजणीकरिता १६ टेबल अशी व्यवस्था केली असून मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत. एकूण १८० कर्मचारी नियुक्त केले असून २७० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांची संख्या २५ आहे.

वाचा सविस्तर

06:41 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: कसब्याचा निकाल आधी लागणार?

कसबा मतदारसंघांची मतमोजणी भारतीय खाद्य गोदाम, तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या ३७, तर कसब्यात २० फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे चिंचवडपेक्षा कसब्याचा निकाल आधी स्पष्ट होणार आहे.

वाचा सविस्तर

06:40 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: २६ फेब्रुवारीला झालं मतदान

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान झाले. मतमोजणी गुरुवारी (२ मार्च) होत आहे.

वाचा सविस्तर

06:39 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होणार

मतदान यंत्रांमधील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची शहानिशा होणार असल्याने निकालाला काहीसा विलंब होणार आहे. तरीदेखील दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.

वाचा सविस्तर

06:37 (IST) 2 Mar 2023
Kasba Chinchwad Bypoll Election: पुण्यात आज मतमोजणीचा दिवस!

पुण्यात कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. संध्याकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

Web Title: Kasba chinchwad bypoll election result live updates vote counting in pune pmw

First published on: 02-03-2023 at 06:35 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा