पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, खडकवासलामधून आमदार भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंटमधून आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत गमाविलेला कसबा मतदारसंघ भाजप पुन्हा काबीज करणार का? याकडे आता लक्ष असणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी भाजपने जाहीर केली. यामध्ये २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून पुणे शहरातील तीन मतदारसंघांतील उमेदवारांचा यात समावेश आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधून विद्यामान आमदार सुनील कांबळे तर खडकवासलामधून भीमराव तापकीर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून खडकवासला मतदारसंघातून माजी नगरसेवक सचिन दोडके यांना, तर पर्वतीमधून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कसबा, खडकवासला तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघांत २०१९ प्रमाणेच लढती पाहायला मिळणार आहेत.

kasba peth assembly
कसबावरून भाजपत धुसफूस, शहराध्यक्ष धीरज घाटे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
kasba peth assembly constituency
‘कसब्या’त दोन्ही बाजूंचा कस, महाविकास आघाडीत बंडखोरी, महायुतीमध्ये नाराजी
Kasba Peth Assembly Election
Kasba Peth Assembly Election 2024 Result: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांचा दारूण पराभव, भाजपाचे हेमंत रासने विजयी
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा : सांगली जिल्ह्यात आघाडीतील गोंधळ संपता संपेना; मिरज, खानापूरमध्ये जागेवरून तर सांगलीत उमेदवारीवरून वाद

u

भाजपचा बालेकिल्ला अशी एकेकाळी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विद्यामान आमदार आहेत. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी अडीच वर्षापूर्वी येथे पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ब्राह्मण उमेदवार न दिल्याने नाराज झालेला मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही त्यामुळे काँग्रेसचे धंगेकर येथून आमदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत भाजप कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले होते. रासने यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक हे इच्छुक होते.

या मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी केली जात असल्याने भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत कसब्याचा उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. शनिवारी रासने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे या मतदारसंघात आता धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्यातच मनसेकडून गणेश भोकरे यांना संधी देण्यात आली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपने आमदार भीमराव तापकीर यांना तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून माजी नगरसेवक सचिन दोडके यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या दोडके यांनी भाजपचे विद्यामान आमदार भीमराव तापकीर यांना कडवी लढत दिली होती. या निवडणुकीत अवघ्या तीन हजार मतांनी दोडके यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर सचिन दोडके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंद केले. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात दोडके यांनी मोठी भूमिका बजाविली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून मनसेने दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : चैनसुख संचेती सातव्यांदा ‘मलकापूर ‘ रणसंग्रामात! मागील लढतीतील प्रतिस्पर्धीच रिंगणात, दुरंगी लढत अटळ

पर्वती विधानसभेसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने आमदार माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघातून काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल इच्छुक असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे येथे चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.

कॅन्टोन्मेंटमधून भाजपने विद्यामान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा काँग्रेसकडे असून त्यांनी अद्यापही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

Story img Loader