पुणे : काश्मीर खोऱ्यातील मुला-मुलींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने असीम फाऊंडेशन आणि लष्कराच्या १५ व्या कोअरच्या (चिनार कोअर) सहकार्याने काश्मीर खोऱ्यामधील बारामुल्ला येथे कौशल्य विकास केंद्र सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रांसाठीचे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव आणि असीम फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी उपस्थित होते. या केंद्रात फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात येत असून, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षा, मूल्यमापन, प्रमाणन (सर्टिफिकेशन) मएसो रेणुका स्वरूप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसमार्फत करण्यात येणार आहे.

Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – पिंपरी विधानसभा: फलकाद्वारे अजित पवारांच्या आमदाराला विचारण्यात आले विविध प्रश्न; गुन्हेगारी, वाहतूक कोंडीचा केला उल्लेख

काश्मीर खोऱ्यातील युवा वर्गाच्या कौशल्याला चालना देण्यासाठी लष्कराकडून काश्मीर खोऱ्यात ७२ ‘चिनार नौजवान क्लब’ची स्थापन करण्यात आली आहे. त्यातील एक क्लबमध्ये मएसो आणि असीम फाऊंडेशन यांच्यातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. स्थानिक लोककलेला प्रोत्साहन देण्यासह रोजगार, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागींपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळत आहे. या केंद्रांमध्ये फॅशन डिझायनिंग, ब्युटी अँड वेलनेस, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योग, बँकिंग, संगीत अशा विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते, असे गोसावी यांनी सांगितले.

या पूर्वी मएसो आणि जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील ददवारा तालुक्यातील फिंतर या गावात असलेले बाल गोविंद विद्यालय यांच्यात शैक्षणिक सहकार्यातून विद्यार्थी-शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रम, विद्यालयाला अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उभारून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे शिंदे आणि गोखले यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

ताबा रेषा भागातही प्रशिक्षण

मएसो, असीम फाऊंडेशन यांच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या चिनार युवा केंद्रात ६५० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. येत्या काळात ताबा रेषेवरील दुर्गम भागातही कौशल्य प्रशिक्षणाचे जाळे विस्तारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला लष्कराच्या १९ व्या डिव्हिजनकडून प्रशासकीय सहकार्य पुरवण्यात येते. हा उपक्रम मुख्यत्वे मुली आणि महिलांमध्ये कौशल्यनिर्मिती करण्याच्या उद्देशाने राबवला जात असल्याचे गोसावी यांनी सांगितले.