पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार, तसेच तिच्याकडून ४५ लाख रुपये उकळणाऱ्या काश्मिरी तरुणाला पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूरमधून अटक केली. त्याने दिल्ली, फरिदाबाद, भोपाळ, इंदूरमधील तरुणींची विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जम्मू काश्मिर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर परिसरातील काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा मूळचा जम्मू काश्मिरमधील आहे. त्याने एका विवाह विषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळाच्या माध्यमातून तो तरुणींशी संपर्क साधायचा. त्यांना विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढायचा. हडपसर परिसरातील एका तरुणीला त्याने आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिच्याकडून वेळोवेळी बतावणी करुन ४५ लाख रुपये घेतले होते. तरुणीची फसवणूक करुन तो पुण्यातून पसार झाला होता.

तरुणीने पोलिसांकडे तपास सुरू केला. वर्मा हा मध्य प्रदेशात पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. वर्माला मध्य प्रदेशातील इंदूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने विवाहाच्या आमिषाने दिल्ली, फरिदाबाद, इंदूर, भोपाळमधील तरुणींची विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याचेे उघडकीस आले. वर्माला अटक करुण्यात आली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक विलास सुतार, हवालदार युवराज दुधाळ, श्रीकृष्ण खोकले यांनी ही कामगिरी केली.

फसवणुकीमुळे डाॅक्टर तरुणीची आत्महत्या

विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन बिबवेवाडीतील एका डाॅक्टर तरुणीची फसवणूक करण्यात आली. सांगलीतील एका डाॅक्टर तरुणाने तिला जाळ्यात ओढून तिच्याकडून पैसे घेतले. डाॅक्टर तरुणाचा विवाह झाल्याचे त्याने तरुणीपासून लपविले होते. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर डाॅक्टर तरुणीने दवाखान्यात विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी सांगलीतील डाॅक्टर तरुणाला नवी मुंबईत अटक करण्यात आली होती.