कात्रज भागात बेकायदा साठवणूक करण्यात आलेल्या गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन झालेल्या दुर्घटने प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकास अटक केली. दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी सागर संदीप पाटील (वय २६), सोनू मांगडे, संपत सावंत, दत्तात्रय काळे (सर्व रा. कात्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


या प्रकरणी पाटील याला अटक करण्यात आली. कात्रज भागात गंधर्व लॉन्स परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा बेकायदा साठा करून ठेवण्यात आला होता. सिलेंडरच्या टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरताना दुर्घटना घडली. एकापाठोपाठ २० सिलेंडरचे स्फोट ‌झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.


काळे जागा मालक असून तेथे सागर पाटीलने बेकायदा व्यवसाय (गॅस रिफिलिंग सेंटर) सुरू केला होता. त्याने तेथे १०० सिलिंडर ठेवले होते. एकापाठोपाठ सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या भागातील घरांचे दरवाजे, खिडक्यांना तडे गेले. आगीत टेम्पोसह एक मोटार जळाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katraj pune cylinder blast illegal storage of cylinder 4 accused one arrested pune print news vsk