वाढती गुन्हेगारी हा पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने कायम चिंतेचा विषय आहे. अलीकडच्या काळात शहरभरात गोळीबारांच्या घटना सातत्याने होत असतानाच बेकायदेशीर पिस्तूल तसेच गावठी कट्टय़ांचा उद्योगनगरीत सुळसुळाट झाल्याचेही प्राकर्षांने दिसून येत आहे. पोलिसांकडून होणारी कारवाई अपुरी व दिखाऊ स्वरूपाची असून बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात बहुतांश वेळा ‘तोडपाणी’च होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेकायदेशीरपणे गावठी कट्टे तसेच पिस्तूल विकणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी गजाआड केले. पोलीस उपायुक्त गणेश िशदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. या निमित्ताने शहरात बाहेर राज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर पिस्तूल तसेच कट्टय़ांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवडचा पसारा वाढतो आहे. राज्यातून तसेच देशभरातून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने नागरिक शहरात येतात, त्यामध्ये गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांचाही समावेश आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून बेकायदेशीरपणे शस्त्रे शहरात आणली जातात आणि कुदळवाडीसारख्या ठिकाणी अशा शस्त्रांची विक्री केली जाते. त्याचाच परिणाम म्हणून शहराच्या विविध भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे तसेच त्यांच्या बगलबच्च्यांकडे अशाप्रकारची बेकायदेशीर शस्त्रे उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात गोळीबाराच्या घटना वाढल्या, हा त्याचाच परिपाक  मानला जातो.पोलीस कारवाई करतात. मात्र बहुतांश वेळा ती कारवाई दिखाऊ स्वरूपाची असते. ‘सापडला तो चोर’ या न्यायाने कारवाई होते. बहुतांश प्रकरणात तोडपाणीच केले जाते.

काही वर्षांपूर्वी पिंपरीच्या एका माजी महापौराच्या मुलाकडे बेकायदेशीर पिस्तूल सापडले होते, ते प्रकरण मिटवण्यासाठी त्या माजी महापौरांना बराच काथ्याकूट करावा लागला होता.

दोन स्वतंत्र घटनांमध्ये भाजपच्या दोन माजी नगरसेवकांकडे गावठी कट्टे आढळून आले होते. अलीकडे, गुन्हेगारीचे आकर्षण असलेल्या व गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तथापि, पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. कारण, होणारी कार्यवाही दिखाऊ स्वरूपाची असल्याचे मानले जाते.

पोलिसांची कारवाई अपूरी

काही वर्षांपूर्वी पिंपरीच्या एका माजी महापौराच्या मुलाकडे बेकायदेशीर पिस्तूल सापडले होते, ते प्रकरण मिटवण्यासाठी त्या माजी महापौरांना बराच काथ्याकूट करावा लागला होता. दोन स्वतंत्र घटनांमध्ये भाजपच्या दोन माजी नगरसेवकांकडे गावठी कट्टे आढळून आले होते. अलीकडे, गुन्हेगारीचे आकर्षण असलेल्या व गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या अल्पवयीन मुलांकडे गावठी कट्टे असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तथापि, पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नाही. कारण, होणारी कार्यवाही दिखाऊ स्वरूपाची असल्याचे मानले जाते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katta pistols pistols