स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे युवा संगीतकार राहुल रानडे यांना केशवराव भोळे पुरस्कार आणि स्वरभास्कर पं.
खास वादकासाठी असलेल्या विजया गदगकर पुरस्कारासाठी प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांची निवड करण्यात आली आहे. तर, मुंबई येथील युवा गायक मंदार आपटे यांना डॉ. उषा अत्रे-वाघ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वरानंद प्रतिष्ठानच्या ४४ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १८ डिसेंबर रोजी मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि विजय मागीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. उत्तरार्धात पुरस्कारविजेते कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
माणिक वर्मा पुरस्कारासाठी त्यांच्या शिष्या आणि गायिका शैला दातार यांचे सहकार्य लाभले आहे. केशवराव भोळे पुरस्कारासाठी भोळे परिवाराचे, वादकासाठीच्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध संतूरवादक सतीश गदगकर यांचे सहकार्य लाभले आहे. तर, डॉ. उषा अत्रे-वाघ पुरस्कारासाठी त्यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे सहकार्य लाभले आहे, असे भोंडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2014 रोजी प्रकाशित
राहुल रानडे यांना केशवराव भोळे पुरस्कार
स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे युवा संगीतकार राहुल रानडे यांना केशवराव भोळे पुरस्कार आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांना माणिक वर्मा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-12-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshavrao bhole and manik varma awards declared