बारामती: बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकास हाच राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांचा ध्यास आहे, यामुळे विकास कामांचा झपाटा सुरू आहे,असे प्रतिपादन माळेगांव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  अँड. केशवराव  जगताप यांनी गुणवडी गावातील काळापुल ते घोरपडे  डोरलेवाडीरस्ता  मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम भूमिपूजन समारंभा प्रसंगी  बोलताना केले. या कार्यकामाच्या अध्यक्षस्थानी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन  शिंदे होते.तर  प्रमुख उपस्थितीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  प्रशांत काटे,  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका माजी  अध्यक्ष नितीन शेंडे, बारामती मार्केट कमिटीचे सभापती विश्वासराव आटोळे आदी उपस्थित  होते.

प्रारंभी जेष्ठ नेते भारत  गावडे पाटील यांनी प्रास्ताविक केले,गावडे पाटील यांनी  सांगितले की,या रस्त्याच्या कामासाठी अजित पवारांनी  ७ कोटी ७९ लाख रुपये मंजूर केले असून हे काम दर्जेदार आणि चांगले  झाले पाहिजे. राजवर्धन शिंदे म्हणाले,  हा रस्ता दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी शेजारील शेतकर्यांनी सहकार्य करावे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते  नितीन शेंडे यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार कुठल्याही विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देत नाहीत,जेष्ठ नेते विश्वनाथ गावडे,  माजी पंचायत समिती सदस्य भारत  गावडे ,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, पत्रकार दिलीपराव शिंदे, सरपंच अर्चना रविंद्र घोडे,माजी  सरपंच सत्यपाल गावडे, नवनाथ गावडे, मधुकर होले, वैजनाथ गावडे, विशाल गावडे ,सुयश गावडे ,संजय फाळके , कालीदास गावडे,संदेश गावडे, धोंडीराम पवार , सुनील गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन  गावडे, तसेच सर्व ग्रापंचायत सदस्य  व कर्मचारी गुनवडी डोरलेवाडी येथील परिसरातील बहुसंख्य  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच ठेकेदार डी. पी. जगताप व त्यांचे सहकारी आणि अधिकारी  शेडगे  हे ही उपस्थित होते त्यांनी सदरचे काम हे सव्वा पाच किमी लांबीचे  व दर्जेदार होणार,अशी माहिती दिली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे, उपस्थित सर्वांचे आभार माजी सभापती संदीप बांदल यांनी मानले.

Story img Loader