पुणे : शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मोठ्या मतदानाची परंपरा कायम राहिली आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात होणाऱ्या या लढतीमध्ये मनसे कोणाची मते घेणार, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. तसेच वाढीव मते प्रस्थापित आमदाराच्या विरोधातील ठरणार का, यावरही या मतदारसंघातील विजय निश्चित होणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला मतदारसंघात शहरी आणि महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन वेळा आमदार असलेले भीमराव तापकीर यांच्यापुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयूरेश वांजळे यांचे आव्हान आहे. मतदारसंघाचा मोठा भौगोलिक विस्तार असूनही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची परंपरा या मतदारसंघाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जपली आहे. त्यामुळे हा वाढता मतटक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Iron worth 20 lakhs stolen from Metro supervisor Pune print news
पिंपरी: मेट्रोच्या पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Loksatta kutuhal Black rock caves
कुतूहल: काळ्या कातळातील लेणी
atomic Mineral Exploration
कुतूहल : आण्विक खनिजांचे अन्वेषण
trouble for residents due to dust on cement roads in Dombivli
डोंबिवलीत सिमेंट रस्त्यांवरील धूळ उधळ्याने रहिवासी हैराण
Tejas Express engine breaks down disrupts traffic on Konkan Railway route
तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हेही वाचा – निकलाआधीच महायुतीचे उमेदवार शंकर जगतापांचे विजयी फ्लेक्स; चर्चेला उधाण

गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्यात तुल्यबळ लढत झाली होती. तापकीर यांनी निसटता विजय मिळवित विजयाची हॅटट्रिक केली होती. या वेळीही त्यांच्यापुढे दोडके यांचे आव्हान आहे. मात्र, मनसेचे उमेदवार मयूरेश वांजळे कोणत्या पक्षाची मते घेणार, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.

सन २००९ मध्ये या मतदारसंघातून मयूरेश यांचे वडील दिवंगत नेते रमेश वांजळे निवडून आले होते. त्या निवडणुकीत शहरातील ते मनसेचे एकमेव आमदार ठरले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत रमेश वांजळे यांची पत्नी हर्षदा विरुद्ध तापकीर अशी लढत झाली. त्या वेळी हर्षदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मयूरेश वांजळे यांची बहीण सायली या वारजे परिसरातून महापालिकेत निवडून आल्या होत्या. या परिस्थितीत मयूरेश यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ते कोणत्या पक्षाची मते घेणार, यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा – दहावीच्या परीक्षेत गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक? राज्य मंडळाने दिले स्पष्टीकरण…

शहरी भागातील भाजपचे संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे या भाजपच्या जमेच्या बाजू असल्या, तरी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची ग्रामीण भागातील ताकत, शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती या बाबी निर्णायक ठरणार असल्या, तरी मनसेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Story img Loader