पुणे : गेल्या काही दिवसांपासून खडकवासला परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात पहिल्यांदाच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली. पुणे शहर परिसरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी घाटमाथा आणि धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीतील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत असून खडकवासला धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा – पिंपरीत भाजपाच्या ‘या’ दाव्याने महायुतीत बिघाडी?

हेही वाचा – निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर अपघात झाल्यास ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; अधिवेशनात सुनील शेळकेंची मागणी

या पार्श्वभूमीवर, आज सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात कोणतेही साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. सखल भागातील नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadakwasla dam filled water discharge from mutha river started pune print news ccp 14 ssb
Show comments