लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुपार पर्यंत तीस टक्के मतदान झाले. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत या मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले असून मतदानाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ कसबा मतदारसंघा नंतर दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला मतदार संघात शहरी आणि महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन वेळा आमदार असलेले भीमराव तापकीर यांच्यापुढे राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांचे आव्हान आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची या मतदारसंघात ताकद आहे.

आणखी वाचा-मावळमध्ये दुपारपर्यंत किती मतदान? मावळ ‘पॅटर्न’चे काय होणार?

सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर वारजे, धनकवडी, आंबेगाव या शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागातही मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्य होत्या. सकाळच्या पहिल्या दोन तासांत ५.४४ टक्के मतदान झाले.त्यानंतर मतदानाचा वेग वाढण्यास सुरूवात झाली. अकरा वाजेपर्यंत ११.०५ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत २९.०५ टक्के मतदानाची नोंद झाली.

खडकावसला मतदारसंघात मनसेचे दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोठा भौगोलिक विस्तार असूनही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची परंपरा या मतदारसंघाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीही जपली आहे. त्यामुळे हा वाढता मतटक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-चार वेळा उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही अजित पवारांवर अन्याय कसा झाला?…शरद पवार यांचा सवाल

ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसची येथे ताकद असली तरी शहरी भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मजबूत जाळे येथे आहे. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक नेहमीच तुल्यबळ ठरली आहे. या निवडणुकीतही हेच चित्र दिसून येत आहे. खडकवासला मतदारसंघात ५ लाख ७६ हजार ५०५ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ८४ पुरूष तर, २ लाख ७२ हजार ७८० महिला मतदारांची संख्या आहे. तसेच ४१ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadakwasla gets highest voter turnout after kasba pune print news apk 13 mrj