पुणे : राज्यात जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरणीचा टक्का वाढला आहे. जुलैअखेर राज्यभरात एक कोटी २६ लाख ३७ हजार २४४ हेक्टरवर म्हणजे सुमारे ८९ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
राज्यात खरिपाचे क्षेत्र सरासरी १.४२ कोटी हेक्टर आहे. त्यापैकी एक कोटी २६ लाख ३७ हजार २४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तृणधान्यांची पेरणी (पान ४ वर) (पान १ वरून) ६५ टक्क्यांवर गेली असून, एकूण २२ लाख ५५ हजार ३७७ हेक्टरवर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. त्यात भाताची १० लाख ४८ हजार ८३८ हेक्टर, ज्वारीची ९९ हजार ६०९ हेक्टर, बाजरीची दोन लाख ७२ हजार ४८३ हेक्टर, नाचणीची ४३ हजार ७८४ हेक्टर, मक्याची सात लाख ६८ हजार ४५५ हेक्टर आणि राजगिरा, राळा कोडू, कुटकी, वरई, सावा या लहान तृणधान्यांची पेरणी २२ हजार २०८ हेक्टरवर झाली आहे.
कडधान्यांची पेरणी ६८ टक्क्यांवर गेली असून, एकूण १४ लाख ४६ हजार ३८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात तुरीची पेरणी १० लाख ३५ हजार ६०३ हेक्टर, मुगाची एक लाख ५२ हजार ७६ हेक्टर, उडदाची दोन लाख ९ हजार ६१ हेक्टर आणि कुळीथ, चवळी, मटकी, राजमा आणि अन्य कडधान्याची पेरणी ४९ हजार ६४० हेक्टरवर झाली आहे. कापसाची पेरणी ४० लाख ९७ हजार ६४४ हेक्टरवर झाली आहे. ती सरासरीच्या ९८ टक्के आहे.
सर्वाधिक पेरणी झालेली पिके
सोयाबिन – ४७ लाख ११ हजार ५९४ हेक्टर
कापूस – ४० लाख ९७ हजार ६४४ हेक्टर
भात – १० लाख ४८ हजार ८३८ हेक्टर
तूर – १० लाख ३५ हजार ६०३ हेक्टर
तेलबियांचा पेरा वाढला राज्यात एकूण ४८ लाख ३७ हजार ८४३ हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली आहे. त्यात भुईमुगाची लागवड एक लाख १५ हजार २२३ हेक्टर, तिळाची तीन हजार ८९९ हेक्टर, कारळाची तीन हजार ९१७ हेक्टर, सूर्यफुलाची एक हजार ४७ हेक्टर, सोयाबिनची लागवड सरासरीच्या ११४ टक्क्यांवर गेली असून, ४७ लाख ११ हजार ७९४ हेक्टरवर लागवड झाली आहे. एरंडासह अन्य तेलबियांची लागवड दोन हजार १६२ हेक्टरवर झाली आहे.