पिंपरीः पिंपरी पालिकेच्या वतीने शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दिवाळीचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता, कचरा विलगीकरण, प्लास्टिक बंदी, प्रदूषण आदींबाबत जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा >>> माहिती भरण्यासाठी १० नोव्हेंबरची मुदत ; माहितीनुसार समग्र शिक्षाच्या निधीचे नियोजन

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता का उपहार’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने जनजागृती आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत खेळ पैठणीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला महेश आढाव, अतुल सोनवणे, भीमराव कांबळे आदी आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सहशिक्षिका अनुजा कांबळे या विजेत्या ठरल्या. याशिवाय, आकुर्डीत पंचतारा नगर येथे, निगडीत भक्ती शक्ती उद्यानाच्या ठिकाणी, थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यानात, चिंचवड येथील राजमाता जिजाऊ उद्यानात, भोसरीत इंद्रायणीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये, मोशीत नागेश्वर मंदिरासमोर, दापोडीत विहाराच्या ठिकाणी खेळ पैठणीचा हे स्वच्छताविषयक जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.

Story img Loader