पिंपरी : काळेवाडी येथील खुशी मुल्ला हिची १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तिच्या निवडीने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कर्णधारपदी निवड झालेल्या खुशीचा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख तसेच खुशी मुल्ला यांचे वडील नवीलाल मुल्ला यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पुणे: विसर्जन मिरवणुकीत दणदणाट भोवला…आठ गणेश मंडळांविरुद्ध गुन्हे
खुशी मुल्ला हिने थेरगाव येथील वेंगसरकर अकादमी येथे १० वर्षांपूर्वी प्रवेश घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील, २३ वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तिला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मार्गदर्शन लाभले. लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊदेखील राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळायचा. त्यामुळे साहजिक क्रिकेटविषयी आवड व प्रेम निर्माण झाले. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी थेरगाव येथे व्हेरॉक वेंगसरकर अकादमीची स्थापना केली. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शनही केले. अकादमीमध्ये भव्य क्रिकेट मैदान आहे. शादाब शेख यांच्यासह इतर मार्गदर्शकांनी माझ्याकडून उत्तम सराव करून घेतल्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि माझी कर्णधारपदी निवड झाली, या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत असून पिंपरी- चिंचवड शहरातून माझी निवड झाल्याने शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यात मी निश्चितच जास्तीत जास्त प्रयत्न करेन, असा विश्वासही खुशी मुल्ला हिने व्यक्त केला.
हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवड: अजित पवार पालकमंत्री होताच बालेकिल्यात फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष
खुशीला लहाणपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ अमन मुल्ला याने क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्यापासूनच खुशीने प्रेरणा घेतली. दिलीप वेंगसरकर यांनी वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी खुशीला मार्गदर्शनही केले. त्यामुळेच ती गौरवास्पद कामगिरी करू शकली, असे खुशीचे वडील नवीलाल मुल्ला यांनी सांगितले.