पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. लोणावळ्यात घरातून दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडून चोप दिला आहे. ही घटना लोणावळ्यात घडली असून अमर त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Kapil Dev Reaction on Yograj Singh Claim That he Went to His House with Pistol to Kill Watch Video
Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यात घरात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा डाव आरोपी अमरने केला होता. रविवारी दुपारी एकच्या सुमारास चिमुकली राहत असलेल्या घरात शिरला आणि चिमुकलीला घेऊन पोबारा करणार तेवढ्यात चिमुकली मोठ-मोठ्याने रडायला लागली. चिमुकली का रडत आहे? हे पाहण्यासाठी चिमुकलीची आई बाहेर आली. तेव्हा अमर तिला घेऊन पसार होण्याच्या तयारीत होता. घरातील व्यक्तींनी त्याला पकडले आणि चोप दिला. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी अमरला अटक केली आहे. पालकांनी अमरला चांगलाच चोप दिला आहे. अद्याप चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न का करण्यात आला याचे कारण समोर आलेलं नाही. पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवल्याने अपहरणासारखी मोठी घटना टळली आहे.

Story img Loader