पिंपरी : शाळांना उन्हाळी सुटी असल्याने बालचमूंची पावले पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि नव्याने सुरू झालेल्या तारांगणकडे वळू लागली आहेत. दिवसाला पाचशेहून अधिक नागरिक या प्रकल्पांना भेटी देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने सात एकर क्षेत्रफळावर सायन्स पार्कचा विस्तार केला आहे. विज्ञानातील अनेक शोध, संदर्भ इमारतीमधील एकूण चार दालनांमध्ये प्रदर्शन स्वरूपात आहेत. खुल्या उद्यानामध्ये विज्ञानाची तत्त्वे उलगडणारी खेळणी ठेवली आहेत. इमारतीमध्ये वाहनांची संपूर्ण माहिती देणारे ऑटोमोबाइल दालन, वातावरणीय बदलांची माहिती देणारे हवामान परिवर्तन दालन, मनोरंजक विज्ञान, ऊर्जा दालनासह ‘उडी सायन्स शो’ व तारामंडल शो सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी विज्ञानातील अनेक मूलभूत शोध त्यांच्या माहितीसह प्रतिकृती स्वरूपात पहावयास मिळतात.

हेही वाचा >>> मुंबईमुळे मिळेना पुण्यात रेल्वेत पाणी!

डायनो पार्क, विज्ञान उद्यान लहान मुलांचे आकर्षण केंद्र आहे. ऑटोमोबाइल दालन, ऊर्जा दालन, हवामान परिवर्तन दालन हे नव्याने सुरू झालेले आहे. या उद्यानातील भारतीय वैज्ञानिकांचे बसवण्यात आलेले अर्धाकृती पुतळे पाहून व त्यांच्या विषयीची माहिती वाचून लहान मुलांना प्रोत्साहन मिळते. याशिवाय आकाश दर्शन, विविध विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रात्यक्षिक कट्टा, उन्हाळी सुटीतील विज्ञान शिबिरे असे अनेक उपक्रम सातत्यपूर्वक या ठिकाणी सुरू आहेत. उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर सायन्स पार्क, तारांगणमध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सायंकाळी साडेसहापर्यंत वेळ वाढविण्यात आली असून, ते सोमवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. याचबरोबर उन्हाळी सुटीमध्ये खगोल विज्ञान, भौतिक, रसायन व जीवशास्त्र या विषयांवर मनोरंजक विज्ञान शिबिरांचेही आयोजन केले आहे. विज्ञानाचा वारसा जपणाऱ्या या वारसास्थळाला प्रत्येक पालक पाल्यासोबत आवर्जून भेट देत आहे.

तारांगणमध्ये दररोज सहा खेळ

तारांगणमध्ये दररोज सहा खेळ होत आहेत. पहिला खेळ सकाळी ११ वाजता सुरू होतो. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमधून हे खेळ दाखविले जातात. सध्या उन्हाळी सुटी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांतील मुले तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दोन ते १२ वर्षांपर्यंत मुलांसाठी तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी ८० रुपये, २० जणांच्या १२ वर्षांपुढील मुलांसाठी १४० रुपये, इतर नागरिकांसाठी सायन्स पार्कला ६०, मुलांसाठी ३०, तर तारांगणसाठी १०० आणि मुलांसाठी ८० रुपये तिकीट दर आहे.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोची स्थानके सुरक्षित!… महामेट्रोने ‘या’ आधारे केला हा दावा

सायन्स पार्क, तारांगणला भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसाला पाचशेहून अधिक नागरिक प्रकल्पांना भेट देत आहेत. तीनही भाषांमध्ये तारांगणमधील आकाशगंगेचा शो दाखविला जातो. खगोलशास्त्राची चित्रफीत पाहिल्यानंतर तारांगणाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सूर्यमालिकेची माहिती होत आहे. दिवसा तारे पाहणे ही बोलण्यातील कल्पना तारांगणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली. प्रवीण तुपे, संचालक, सायन्स पार्क

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kids huge response to visit pimpri chinchwad science park pune print news ggy 03 zws