विठ्ठल मणियार

पुण्याच्या ‘बिशप्स स्कूल’ या इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत घडलेला हा किस्सा. वर्गात शिकण्याकडे लक्ष नसलेला एक विद्यार्थी चक्क बाकावर डोके टेकवून झोपला होता. शिक्षकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी त्या विद्यार्थ्यास उठवले. रागावून म्हणाले, ‘‘झोपच घ्यायची आहे, तर बाकावर का झोपतोस? पलंगावर झोप.’’ वडिलांचा फर्निचरविक्रीचा व्यवसाय असलेल्या या विद्यार्थ्याने दुसऱ्या दिवशी दुकानातून एक पलंग शाळेत नेला. त्याच शिक्षकांच्या तासाला वर्गात पलंग लावून तो चक्क झोपी गेला. शिक्षकांच्या दृष्टीस हा प्रकार आला. स्वाभाविकच त्यांचा राग अनावर झाला. ‘हा काय प्रकार आहे?’ अशी त्यांनी रागातच विचारणा केली. विद्यार्थी उत्तरला, ‘‘सर, आपणच म्हणाला होतात ना; झोपायचं असेल तर पलंगावर झोप म्हणून. तुम्ही शिकवता ते मला समजत नाही, झोप येते.’’ पुढील सर्व रामायण पालकांना येऊन निस्तरावे लागले.

buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
wardha school students attendance biometric
प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर लगाम!; शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसल्यास…
8 year girl dies due to Attack
Heart Attack : धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना कोसळली; कुठे घडली घटना?

हा विद्यार्थी होता औषधाच्या क्षेत्रात क्रांती करणारा आमचा महाविद्यालयीन काळापासूनचा मित्र ‘सायरस पूनावाला.’ अत्यंत मिस्कील, खोडकर स्वभाव असणारा सायरस वाणिज्य विषयाची पदवी घेऊन वडलांचा हॉर्स ब्रीडिंगचा व्यवसाय पाहू लागला होता. त्या काळात हा व्यवसाय फारसा फायदेशीर राहिला नव्हता. म्हणून सायरसने शर्यतीच्या घोड्यांऐवजी शर्यतीसाठीच्या मोटारगाड्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. एक महागडी गाडी बनवलीदेखील. परंतु अशा महागड्या गाड्या भारतात विकल्या जाणार नाहीत हे अनुभवास येताच त्याने गाड्या बनवण्याचा व्यवसाय तेथेच सोडून दिला.

हेही वाचा : वर्धानपनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी

त्या काळात ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ला उत्तम घोड्यांची पैदास करून अँटिबॉडीज् लस उत्पादनासाठी असे घोडे पूनावाला विकत असत. त्यातून धनुर्वातासारख्या रोगावर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये लस उत्पादन होत असे. सायरसचे यावर बारकाईने लक्ष होते. आपण स्वत: अशी लस तयार करण्याचा प्रकल्प उभा करण्याचे सायरसच्या मनात आले. पूनावाला फार्म या त्यांच्या मालकीच्या जागेत स्वत:ची लस तयार करण्याचे सायरसने ठरवले. पूनावाला कुटुंबीयांचे डॉक्टर जाल मेहता यांचा हाफकिन इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. पी. एन. वागळे यांच्याशी खूप चांगला परिचय होता. डॉ. मेहतांनी सायरसशी त्यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या सल्ल्याने सायरसने दोन-तीन वैज्ञानिकांच्या मदतीने प्रयोगशाळा उभी केली. केवळ पाच लक्ष रुपयांच्या भांडवलावर ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची सुरुवात झाली.

देशात धनुर्वातावर लागणाऱ्या लसींचा तुटवडा होता. सिरममध्ये त्यावरील लस बनवण्यास सायरसने सुरुवात केली. अश्व शर्यतीसाठी जे घोडे निकामी होतात, त्यांच्या रक्तातील काही पेशींपासून प्राण वाचवू शकणारी काही औषधे सिरममध्ये उत्पादित होऊ लागली. देशामध्ये त्या काळी बालमृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्या दृष्टीने हे प्रमाण कमी कसे करता येईल या विचाराने संशोधन करून तशी लस बनवण्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट’ यशस्वी झाली. तोपर्यंत देशात फक्त ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ ही लस बनवीत होती; परंतु ती पुरेशी नव्हती. स्टड फार्मचा योग्य उपयोग करून सायरसने त्याचे उत्पादन वाढवले. सिरमला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’कडून (डब्ल्यूएचओ) अधिकृत मान्यता मिळाली. युनिसेफ, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनसारख्या यूएन एजन्सीलाही ही औषधे पुरवणारी ‘सिरम’ ही पहिली संस्था ठरली.

हेही वाचा : “लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांना देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्तेच खूप झाले”, भाजपचे माजी खासदार संजय काकडेंचे विधान

जगात जन्मणारी मुले सशक्तपणे वाढली पाहिजेत या हेतूने सायरस काम करीत राहिला. ‘हेल्थ फॉर ऑल बाय २००० एडी’च्या झालेल्या प्रकृतीविषयीच्या कार्यक्रमाच्या यशात सर्वांत अधिक लस पुरवण्याचा सिरमचा सिंहाचा वाटा होता. जगभरात २०१५ नंतर जन्मलेल्या बालकांपैकी सुमारे दोन तृतीयांश (२/३) बालकांना सिरमच्या लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. सिरमच्या अत्यंत अल्प किमतीत लस देण्यामुळे गरीब देशांतील जवळपास तीन कोटी बालकांचे जीव वाचले आहेत.

सिरमच्या एकूण लस उत्पादनापैकी जवळपास ८० टक्के उत्पादन १७० हून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाते. या क्षेत्रात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड यांसारख्या असाध्य रोगांवर लसनिर्मितीचे प्रयोग व प्रयत्न सायरस आणि आदर सतत करीत आहेत. त्यात त्यांना यश मिळेल याची खात्रीही आहे. अत्यंत कमी किमतीत लसींचा पुरवठा करण्याचे काम अव्याहतपणे सिरम करीत आहे. हे सर्व करीत असताना या संपूर्ण विषयाचे संशोधन करण्याकडे सायरसचा सतत कल राहिला. त्याला धरूनच त्याने एक प्रबंध लिहिला, जो पुणे विद्यापीठाने स्वीकारून सायरसला पीएच.डी. पदवी प्रदान केली आणि सायरस ‘डॉक्टर पूनावाला’ झाला.

हेही वाचा : वर्धानपनदिन विशेष : पुण्याचं विस्तारणारं शैक्षणिक क्षितिज

सन २०२०च्या मार्चमध्ये देशात आणि जगात कोरोनाचा संसर्ग पसरू लागताच यावर मात करण्यासाठी सिरमने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. सायरसएवढीच दूरदृष्टी असलेला त्याचा मुलगा आदर, जो कंपनीचा सीईओ आहे, त्याने हे आव्हान स्वीकारले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर ‘कोव्हिशिल्ड’ लसनिर्मितीचा त्याने एक अब्ज लस उत्पादनाचा करार केला. मागणी नसताना केलेल्या या लसींच्या साठ्याचा उपयोग कोरोना काळात झाला. सरकारच्या योजनेप्रमाणे लस नागरिकांना देण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात लगेचच सुरू झाला. अनेकांचे प्राण वाचवणारे हे पिता-पुत्र देवदूतच ठरले. हा व्यवहार आर्थिक फायद्यासाठी नसून, देशाप्रति आणि कोरोनासारख्या महामारीच्या उच्चाटनाप्रतिची आपली बांधिलकी असल्याचे हे पिता-पुत्र मानतात. लस उत्पादन करणाऱ्या या संस्थेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन वेळेस प्रत्यक्ष भेट देऊन पूनावालांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुकही केले. माननीय शरद पवारसाहेब यांनीही या काळात सिरमला भेट देऊन सायरस पूनावालांना प्रोत्साहन दिले.

अशा या सायरसला त्याच्या कार्याबद्दल देश-परदेशांतील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यातील २००५ मध्ये भारत सरकारने त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून ‘पद्माश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सन २०२२मध्ये ‘पद्माभूषण’ पुरस्कारानेदेखील सन्मानित केले गेले. बिल गेट्स यांच्या हस्ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चकडून (आयसीएमआर) ‘लाइफटाइम अचिव्हमेंट मेडल’ प्रदान करण्यात आले. ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ( ल्ल्र१२ उं४२ं) ही मानद पदवी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून (यूके) यांच्याकडून देण्यात आली. ‘व्हॅक्सिन हीरो अॅवॉर्ड’ ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अॅण्ड इम्युनायझेशन या संस्थेमार्फत अबुधाबी येथे प्रदान करण्यात आले. या व्यतिरिक्त जॉन्स हाफकिन्सचे डीन्स मेडल, एशियन डीलर्स फोरम-दुबईचे ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड’, युनिव्हर्सिटी ऑॅफ मॅसेच्युसेट्स ( टं२२ूंँ४२ी३३२) (बोस्टन) यांनी दिलेली ‘डॉक्टर ऑफ .ह्युमन लेटर्स’, लंडन येथे भरलेल्या दि एशियन अॅवॉर्ड कार्यक्रमामधील ‘बिझनेस लीडर ऑफ दि इअर, वर्ल्ड व्हॅक्सिन काँग्रेस एशिया यांनी प्रदान केलेली ‘बेस्ट व्हॅक्सिन एक्झिक्युटिव्ह ऑफ दि इअर’, दि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (पीएएचओ) आणि पॅन अमेरिकन हेल्थ एज्युकेशन फाउंडेशन (पीएएचईएफ) या संस्थेमार्फत मिळालेले ‘एक्सलन्स इन इंटर अमेरिकन पब्लिक हेल्थ अॅवॉर्ड’, १९८७ मध्ये सर रिचर्ड अॅटेनबरो यांच्या हस्ते ब्रिटिश मेडिकल असोसिएशनतर्फे सापाच्या दंशावरील केलेल्या लघुपटास मिळालेले अॅवॉर्ड, असे अनेक देश-परदेशातील सन्मानांनी सायरसला पुरस्कृत करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

सायरसची पत्नी विलू यांचे निधन झाल्यानंतर त्याने २०१३ मध्ये ‘विलू पूनावाला चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून सायरस अनेक सामाजिक, शैक्षणिक, वैद्याकीय, क्रीडा आदी क्षेत्रांतील संस्थांना भरघोस आर्थिक मदतही देणगी रूपाने देऊन त्या उभ्या करीत आहे. व्यवसायाबरोबरच समाजाचेही मी देणे लागतो ही भावना सायरसच्या मनामध्ये ओतप्रोत भरली आहे, हे त्याच्या कृतीतून सतत जाणवते. वयाच्या २५ व्या वर्षी पाच लाख रुपये भांडवलावर सुरू केलेल्या ‘सिरम’ची उलाढाल आज जवळपास आठ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सायरसने आपल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या त्याचा एकुलता एक मुलगा आदर, तो २० वर्षांचा असतानाच त्याच्यावर सोपवल्या. आता तो ४० वर्षांचा झाला. सिरमचा व्याप दुपटीने वाढला. सायरस मुलाच्या कर्तृत्वावर समाधानी आणि निश्चिंत आहे.

सायरस व्यक्तिगत जीवनात आमचा फार चांगला मित्र आहे. वर्गमित्र असलेल्या शरद पवार यांच्या .राजकीय वाटचालीबद्दल व धोरणाबद्दल सायरसला अधिक कुतूहल; त्यामुळे महत्त्वाच्या राजकीय घटनांबद्दल साहेबांबरोबरच्या भेटीत सायरस आपली मते परखडपणे मांडण्यात कधीच कचरत नाही. पवारसाहेबही सायरसच्या मतांचा आदर करतात. आमची ही ६४ वर्षांची अभेद्या मैत्री.साहेब, मी, कर्नल पाटील, चंदू चोरडिया, श्रीनिवास पाटील, बालकुमार अग्रवाल, शिवदास डागा आदी मित्र अनेकदा एकत्र जमतो. व्यावसायिक जीवन विसरून कॉलेजमधील विद्यार्थी असल्यासारखे गप्पांत रमून जातो. धर्माने पारशी असणाऱ्या सायरसला शुद्ध मराठी येत नसले, तरी त्याला आमच्याबरोबर मराठीत बोलण्याची मोठी हौस. त्याची गमतीची मराठी ऐकून आम्ही हसत राहणार. जेवताना ‘साहेबां’ना ‘भात वाढ’ म्हणण्याऐवजी ‘त्यांना तांदूळ दाखव’ म्हटलं, की हशाच हशा! मग सायरस म्हणणार, ‘‘विठ्ठल, तुम्ही मला फतरा मारला ना!’’

Story img Loader