बारामती : बारामतीतील किरण राजेंद्र देशमुख या २६ वर्षीय युवतीचा ‘जीबीएस सिंड्रोम ‘ या आजारामुळे मंगळवारी (ता. १८ रोजी )मृत्यू झाला, गेल्या काही दिवसापासून तिची या आजारावर उपचार चालू होते, ती या आजाराची झुंज देत होती, मात्र तिचे हे प्रयत्न अपयशीच ठरले,
किरण देशमुख ही पुण्यात सिंहगड परिसरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने त्यांच्या जवळच्या नातेवाईकान कडे राहत होती, त्याच दरम्यान तिला “जीबीएस” या आजाराची लागण झाली होती ,किरणच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा बारामती येथील जळोची या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, तिच्या निधनामुळे या परिसरामध्ये शोककळा पसरली होती, गेल्या काही महिन्यापासून पुण्यातील परिसरामध्ये जीबीएस सिंड्रोम चे रुग्ण वाढीस लागत आहेत, किरण राहत असलेल्या परिसरामध्येही काही रुग्ण आढळल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजले.
दरम्यान, किरणच्या नातेवाईकांनाही अचानक त्रास जाणून लागला आणि किरणला देखील त्रास होऊ लागला, जुलाब आणि अशक्तपणामुळे त्यांच्या कुटुंबा जवळच्या असलेल्या तज्ञ डॉक्टरांना तातडीने दाखवले, डॉक्टरांना उपचारा दरम्यान किरणचा आजारपणाची माहिती कळाल्याने पुढील उपचारासाठी पुण्यामध्ये दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, त्यानुसार किरण हिला पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, उपचारा दरम्यानच किरण की प्रकृती खालावत गेली, मंगळवार (दिनांक २० फेब्रुवारी) रोजी तिचे निधन झाले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.
बारामती मधील जळोची येथे किरण देशमुख हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, किरण हिने पुण्यामध्ये राहून एमसीए ही पदवी मिळवत आपले शिक्षण पूर्ण केले होते, शिक्षण पूर्ण होताच ती नोकरीच्या शोधामध्ये होती, मात्र याच दरम्यान तिला या आजाराची लागण झाली, “जीबीएस सिंड्रेम ” या आजाराने अखेर तिचा बळी घेतला, किरण देशमुख हिच्या मृत्यूप्रकरणी बारामती परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे,
किरण देशमुख हिच्या घरची परिस्थिती सुद्धा अगदी बेताचीच असल्याचे समजते, किरण देशमुख हिचे वडील रिक्षा चालक आहेत, काही दिवसांपूर्वी बारामतीतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना किरण देशमुख यांच्या वडिलांनी लेखी निवेदन दिले होते, या निवेदनामध्ये किरण हिच्या उपचाराबाबत माहिती देण्यात आली होती. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते, या उपचारा दरम्यान अखेर या युवतीचा मृत्यू झाला.